Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी… विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या भिंतींना पडलेल्या भेगा, इमारतीला गेलेले तडे आणि उखडलेली फरशी यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 02, 2026 | 01:56 PM
Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी... विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Chandrapur News: धोकादायक इमारतीत शिक्षणाचा खेळ; भेगा पडलेल्या भिंती, उखडलेली फरशी... विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Follow Us
Follow Us:
  • शाळेच्या इमारतीची अद्याप ठोस दुरुस्ती झालेली नसल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी
  • पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज – ग्रामस्थ
चिमूर: भिंतींना पडलेल्या भेगा, इमारतीला गेलेले तडे आणि उखडलेली फरशी अशा धोकादायक परिस्थितीत रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असतानाही शाळेच्या इमारतीची अद्याप ठोस दुरुस्ती झालेली नसल्याने पालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नेरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अवस्था दिवसेंदिवस खराब होत आहे. शाळेच्या भिंतींना ठिकठिकाणी भेगा व तडे गेले असून वर्गखोल्यांमधील फरशीही उखडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशाच असुरक्षित वातावरणात दररोज वर्गात बसावे लागत आहे.

कोलवडीत व्यावसायिकावर लोखंडी रॉड, दांडक्याने हल्ला; सोन्याची चैन, घड्याळ अन् रोकड हिसकावली

शाळेच्या इमारतीची दुरवस्था ग्रामपंचायत तसेच संबंधित शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. नवीन इमारत बांधावी किंवा सध्याच्या इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी वेळोवेळी अर्ज व निवेदने देण्यात आली. मात्र, पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. शाळेच्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न ग्रामसभेतही उपस्थित करण्यात आला. यावेळी उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने निवेदने, आश्वासने आणि पाठपुरावा यापलीकडे प्रश्न सरकलेला नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. प्रशासनाने केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

इमारतीची अवस्था चिंताजनक असताना एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन इमारतीची तातडीने तांत्रिक तपासणी करावी आणि इमारत वापरण्यास सुरक्षित आहे की नाही, याबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या

रामपूरच्या शाळेची ईमारत विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जोडलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने इमारतीची पाहणी करून धोकादायक भागाची दुरुस्ती, आवश्यक असल्यास नवीन इमारतीचा प्रस्ताव आणि तोपर्यंत विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित पर्यायी व्यवस्था करावी. कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्ष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून, या प्रश्नाकडे आता तरी गांभीर्यान पाहिले जाईल का, याकडे रामपुरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पुण्यातील चारही धरणांत 94 टक्के पाणीसाठा; ‘खडकवासला’त गेल्या वर्षीच्या तुलनेत 1.74 TMC घट

निर्लेखनासाठी जिल्ह्याला प्रस्ताव पाठविलेला आहे. याबाबत आम्ही वरिष्ठ अधिका-यांकडे पाठपुरावा केलेला आहे. पुढील कार्यवाही वरिष्ठ स्तरावरून करण्यात येईल. – आशीर्वाद सोनपिंपळे, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती चिमूर

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Rampur zp school building in dangerous condition students safety at risk hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!
1

Diveagar Beach Picnic Accident: दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना!

MUMBAI : शिवाजी पार्कात आंदोलन नको, आझाद मैदानात जा; CJPच्या आंदोलनाला स्थानिकांचा विरोध
2

MUMBAI : शिवाजी पार्कात आंदोलन नको, आझाद मैदानात जा; CJPच्या आंदोलनाला स्थानिकांचा विरोध

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश
3

नववीच्या विद्यार्थ्यांना आता आयकराचे धडे; NCERT अभ्यासक्रमात वैयक्तिक टॅक्सचा समावेश

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा
4

115 द्वीपकल्पांचा देश, सुंदरतेत क्रमांक पहिला, PM मोदींच्या भेटीनंतर वाढली सेशेल्सची चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.