Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: गॅस संपला, केरोसिन मिळाले… पण जाळायचे कसे? स्टोव्ह नसल्याने नागरिकांसमोर नवा पेच

एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाल्याने राज्य शासनाने पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून पुन्हा केरोसिन देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरवठ्यासमोर स्टोव्हची अनुपलब्धता आणि साठवणुकीच्या अडचणी मोठे आव्हान ठरत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 04, 2026 | 02:59 PM
Chandrapur News: गॅस संपला, केरोसिन मिळाले... पण जाळायचे कसे? स्टोव्ह नसल्याने नागरिकांसमोर नवा पेच

Chandrapur News: गॅस संपला, केरोसिन मिळाले... पण जाळायचे कसे? स्टोव्ह नसल्याने नागरिकांसमोर नवा पेच

Follow Us
Follow Us:
  • पात्र शिधापत्रिकाधारकांना दरमहा 3 लिटर केरोसिन देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून ग्रामीण व निमशहरी भागाला प्राधान्य दिले जाणार आहे.
  • 2019 नंतर केरोसिन बंद झाल्याने घरातील स्टोव्ह भंगारात गेले, आता बाजारातही सहज उपलब्ध नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
  • केरोसिन साठवण्यासाठी टाक्या, मोजमाप साधने आणि स्वतंत्र जागा नसल्याने वितरणात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
चिमूर: आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिकाधारकांना केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. ७ वर्षांपूर्वी केरोसिन वाटप बंद झाल्याने अनेकांच्या घरातील गॅस-स्टोव्ह किंवा वातीचे स्टोव्ह मोडीत निघाले. आता केरोसिन मिळाले तरी ते वापरायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे, मात्र रेशन दकानातून केरोसिन पुरवठ्याची अंमलबजावणी करण्यात अडचणींचा डोंगर उभा ठाकण्याची शक्यता दिसून येत आहे. नागरिकांच्या घरातील स्टोव्ह भंगारात गेले असून दुकानातही सद्यास्थितीत स्टोव्ह उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे.

Raigad News: जिल्हा परिषदेत अध्यक्षपद ठरलं; आता ‘मलाईदार’ खात्याकडे सर्वांचे लक्ष

युद्धामुळे राज्यात एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली. मात्र शासन टंचाई नसल्याचे भासवित असले तरी नागरिक पहाटेपासूनच गॅस एजंसीसमोर रांगा लावत असल्याचे दृष्य निदर्शनास येत आहे. युद्ध केव्हा संपेल व एलपीजी गॅस वितरणाची परिस्थिती केव्हा पूर्वपदावर येईल, हे अद्यापही अनिश्चित आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिकाधारकांना पुन्हा केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत दरमहा प्रती शिधापत्रिका ३ लिटर केरोसिन अनुज्ञेय असेल आणि हे वितरण विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागात प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे.

स्टोव्ह, शेगड्या अडगळीत

कोविड महामारी सुरू झाल्यापासून २०१९ मध्ये केरोसिन पुरवठा पूर्णपणे बंद झाल्यानंतर घरातील स्टोव्ह आणि शेगड्या अडगळीत गेल्या किंवा भंगारात निघाल्या. आता बाजारपेठेतही हे साहित्य सहज उपलब्ध नाही. त्यामुळे रॉकेल मिळाले तरी ते जाळण्यासाठी लागणारे साधन कोठून खरेदी करावे, असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

साठवणुकीसाठी दुकानदारांसमोर अडचणी

रेशन दुकानदारांमार्फत हे वाटप होणार असले, तरी त्यांच्याकडे सध्या केरोसिन साठवणुकीसाठी टाक्या किंवा मोजमापाची परिमाणे उपलब्ध नाहीत. साठवणुकीसाठी स्वतंत्र गोदाम किंवा खोली नसल्याने हे केरोसिन नेमके ठेवायचे कुठे, असा पेच दुकानदारांपुढे निर्माण झाला आहे.

प्रतिकुटुंब ३ लिटर केरोसिन एका महिन्यासाठी पुरेसे नाही. शिवाय, बाजारात स्टोव्ह किंवा शेगडी सहज उपलब्ध होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. – प्रतिमा मेश्राम, गृहिणी, पिपर्धा

Mumbai News: मुंबईतील शेकडो कुटुंबांसाठी दिलासादायक! प्रलंबित LIC इमारतीच्या पुनर्विकासाचा मार्ग होणार मोकळा

शासनाने केरोसिन पुरवठ्यासोबतच स्टोव्ह किवा शेगडीसुद्धा वाजवी किमतीत उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून नागरिकांची धावपळ थांबेल, सध्या बाजारात स्टोव्ह किंवा पंपाच्या शेगड्या उपलब्ध नसल्याने ग्राहकापुढेही पेच निर्माण झाला आहे.- सविता शेरकुरे, पळसगाव

चिमूर तालुक्याची ग्रामीण भागासाठी प्रतिकुटुंब ९५ हजार लिटरची मागणी आहे, ती पाठविली आहे. – प्रवीण वानखेडे, पुरवठा निरीक्षक, चिमूर

Web Title: State restarts kerosene supply through ration shops amid lpg shortage but lack of stoves creates new trouble chandrapur news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’
1

Rishabh Pant च्या Pay Cut बाबत ट्वीट करत उद्योगपती हर्ष गोयंकांनी उडवली खिल्ली; म्हणाले, ‘कॉर्पोरेट लाईफमध्ये असा…’

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!
2

अमिताभ बच्चन यांच्या एक्झिटमुळे DP Wires कंपनी चर्चेत; बिग बींनी शेअर्स विकून कमावले कोट्यवधी रुपये!

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट
3

मुख्यमंत्री Thalapathy Vijay यांच्या सरकारसाठी मोठा बिझनेस बूस्ट; तमिळनाडूमध्ये येणार Bajaj चा नवा EV प्लांट

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय
4

फक्त ₹१०० पासून सुरू करा गुंतवणूक, जेव्हा हवं तेव्हा पैसे काढा! Swiggy वर थेट मिळणार Zerodha म्युच्युअल फंडचा पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.