Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

पारंपरिक रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ कारवा येथील ग्रामस्थांनी कारवा-शिवणी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी त्यांनी कारवा-मोहली-खुटवंडा-झरी-पेठ तसेच मोहली गेटमार्गे चंद्रपूरकडे जाणारा पारंपरिक मार्ग तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 05, 2026 | 02:58 PM
Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन Chandrapur News: ताडोबातील पारंपरिक रस्ता बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त; पारंपरिक रस्ता सुरू करण्यासाठी वन विभागाविरोधात आंदोलन

Follow Us
Follow Us:
  • कारवा-शिवणी मार्गावर रास्ता रोको आंदोलन
  • ३०० महिला-पुरुषांचा आंदोलनात सहभाग
  • कारवा-मोहली-खुटवंडा-झरी-पेठ तसेच मोहली गेटमार्गे चंद्रपूरकडे जाणारा पारंपरिक मार्ग तातडीने पूर्ववत सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
नवरगाव: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर क्षेत्राच्या सीमेवर असलेल्या कारवा (ता. सिंदेवाही) येथील ग्रामस्थांनी पारंपरिक रस्ता बंद केल्याच्या निषेधार्थ शनिवारी दुपारी कारवा-शिवणी मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. मोहुर्ली गेटमार्गे चंद्रपूरला जाणारा वर्षानुवर्षांपासून वापरात असलेला मार्ग पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी सुमारे ३०० महिला-पुरुषांनी आंदोलनात सहभाग घेतला. मागण्या तातडीने मान्य न केल्यास वन अधिकाऱ्यांना ‘गावबंदी’ करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

Wardha News : पाऊस गायब, जलाशयही अर्धवट! वर्धा जिल्ह्यावर जलसंकटाचे सावट

कारवा येथील ग्रामस्थ मोहलीमार्गे चंद्रपूरकडे ये-जा करण्यासाठी या पारंपरिक मार्गाचा नियमित वापर करतात. मात्र, वन विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता हा मार्ग बंद केल्याने नागरिकांना आता शिवणीमार्गे सुमारे १३ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे वेळ, इंधन व आर्थिक खर्च वाढला असून, विद्यार्थी, शेतकरी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. (फोटो सौजन्य – AI Created)

या प्रश्नाकडे वनप्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी १४ जुलै रोजी ताडोबाच्या उपसंचालकांना लेखी निवेदन दिले होते. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी रात्री गावबैठक घेऊन आंदोलनाचा निर्णय घेतला.

कारवा-मोहली-खुटवंडा-झरी-पेठ तसेच मोहली गेटमार्गे चंद्रपूरकडे जाणारा पारंपरिक मार्ग तातडीने पूर्ववत सुरू करावा, अशी ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. वन विभागाच्या विकास व संवर्धनाच्या कामांमध्ये स्थानिक बेरोजगार तरुणांना प्राधान्य देऊन रोटेशन पद्धतीने रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच कोअर क्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्यास कोणतीही टाळाटाळ न करता नुकसानग्रस्तांना तत्काळ व योग्य भरपाई द्यावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

१३ किलोमीटरच्या फेऱ्याने संताप

ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पर्यटनातून शासनाला मोठा महसूल मिळत असताना जंगलाच्या सीमेवर राहणाऱ्या स्थानिक नागरिकांनाच दळणवळणासाठी अतिरिक्त १३ किलोमीटरचा फेरा मारावा लागत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. पारंपरिक मार्ग पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व लवकुश पुसाम, विनोद मडावी, किष्णा लेनगुरे, चरनदास मानकर आणि सुरेश आदे यांनी केले. आंदोलनात कारवा परिसरातील महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

ग्रामस्थांच्या सर्व मागण्यांची सविस्तर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तातडीने आली पाठवण्यात असून यावर लवकरच वरिष्ठ स्तरावरून नियमांतर्गत तोडगा काढला जाईल. – विनोद जांभुळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, अंधारी व्याघ्र प्रकल्प, कारवा

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Tadoba road blockade 300 villagers protest closure of traditional route demand immediate reopening hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral
1

Raebareli Government Hospital: संतापजनक!!! सरकारी दवाखान्यात पैसे मागणी, गर्भवती महिला रस्त्यावर झाली बाळंतीण, Video Viral

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
2

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल
3

Nagpur News : भंगार विक्रीतून कमावले ३२४ कोटी; भारतीय रेल्वेत मध्य रेल्वे अव्वल

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी
4

Raigad News: पाताळगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; उद्योगांच्या सांडपाण्याची शास्त्रीय तपासणी करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.