Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम

गावातील प्रभाग क्रमांक २ मध्ये नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात जंतूसदृश घटक आढळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकारामुळे आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 23, 2026 | 02:55 PM
Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम

Chandrapur News: तळोधीतील नळाच्या पाण्यात जंतूसदृश घटक? ग्रामस्थ आक्रमक, ग्रामपंचायतीला २४ तासांचा अल्टिमेटम

Follow Us
Follow Us:
  • गेल्या काही दिवसांपासून नळाच्या पाण्यात सजीवांसारख्या गोष्टी आढळल्या
  • समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण
  • संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी
तळोधी: गावातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर तळोधी येथील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. गावातील प्रभाग क्रमांक २ मध्ये नळाद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यात जंतूसदृश घटक आढळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वॉर्ड क्र. २ मधील रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून नळाच्या पाण्यात सजीवांसारख्या गोष्टी दिसून येत आहेत.

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!

यासंदर्भात नागरिकांनी व्हिडिओ तसेच अन्य पुरावे ग्रामपंचायत प्रशासनाला दाखवून समस्या निदर्शनास आणून दिली. मात्र, अद्यापही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेबाबत प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक असताना दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

२४ तासांचा अल्टिमेटम; आक्रोश मोर्चाचा इशारा

या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासक यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, तसेच गावातील पाणीपुरवठ्याची तपासणी करून शुद्ध पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (बीडीओ) आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रार करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

कर वसुली नियमित, मग सुविधा का नाहीत?

ग्रामपंचायत प्रशासनाकडून घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली केली जाते, मात्र त्या तुलनेत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. कर वसुली करताना प्रशासन तत्पर असते, मग नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत ही उदासीनता का, असा सवाल महिलांसह ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

CSMT Roof Collapse: मुंबईतील CSMT स्थानकात दुर्घटना! तिकीट घराच्या प्रवेशद्वाराजवळ छत कोसळले, दोघे जखमी

आम्ही वारंवार सूचना करूनही ग्रामपंचायत प्रशासन समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. समस्या सुटत नसतील तर ग्रामपंचायतीला कुलूप लावायचा ला वेड लागणार नाहि ग्रामपंचायत अधिकारी आणि प्रशासकांनी मुख्यालयी राहून तात्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा भव्य आक्रोश मोर्चा काढू. – परिमल मदनकर, सामाजिक कार्यकर्ते, तळोधी

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Talodhi residents allege contaminated tap water give gram panchayat 24 hour ultimatum hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ
1

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर
2

Khagras Marathi Movie: नावातच गूढ, पोस्टरमध्ये रहस्य! ‘खग्रास’ चित्रपटाची पहिली झलक समोर

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!
3

Jhumka Patola Song: सीमा पाहवा यांचा डान्स पाहून बॉलिवूडही थिरकलं! सेलिब्रिटींच्या कमेंट्सनी वेधलं लक्ष!

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!
4

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.