जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगूनच टाकलं
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मध्यरात्री भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये एक तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. बावनकुळेंच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हदेखील उपस्थित होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठं काहीतरी घडणार अशा चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर खुलासा केला आहे.
मंत्र्यांच्या ओएसडींकडून 3 कोटींच्या एका कामासाठी 5 लाखांची मागणी, अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
जयंत पाटील काल सांगली जिल्हा आणि त्यांच्या जिल्ह्यातील महसुली खात्याशी संबंधित काही विषय घेऊन भेट घेण्यासाठी आले होते. विखे पाटील सोबत होते. 14 ते 15 विषय महसूल विभागाशी संबंधित असल्याने भेट झाली. सांगली जिल्ह्याच्या विकास कामाबद्दल त्यांनी चर्चा केली. येणाऱ्या अधिवेशनात या 14 समस्या माझ्या दालनात बैठक लावून सोडवणार आहे, असं आश्वासन त्यांना दिलं आहे.
काल संध्याकाळी साडे आठ ते नऊ दरम्यान माझ्या अधिकृत बंगल्यावर ही भेट झाली. तेव्हा 400 ते 500 लोक त्या ठिकाणी होते. ही राजकीय भेट नव्हती, कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. फक्त विकास कामांची चर्चा झाली. जयंत पाटील यांनी काल कुठलीही राजकीय चर्चा केली नाही आणि मी जयंत पाटील यांच्या राजकीय भवितव्याबद्दल बोलावं एवढा मोठा नाही, असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांबाबत मला काल रात्री त्या संदर्भातली माहिती मिळाली. काही उपजिल्हाधिकारी, तहसीलदार या पार्टीमध्ये आले होते. मिळालेला माहितीप्रमाणे तो रिसॉर्ट अनधिकृत आहे. त्या संदर्भातील माहिती अधिकाऱ्यांना मागितली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा रिपोर्ट आल्यानंतर कारवाई केली जाईल.
अडीच हजार कोटीचा दारू घोटाळा दिल्लीत आप सरकारने केला आहे. कॅगच्या अहवालातून ते स्पष्ट झालं आहे. चुकीच्या पद्धतीने परवाने दिले, पैसे गोळा करण्यासाठी केजरीवाल सरकारने हा घोटाळा केला होता. वीस हजार कोटीच्या वर हा घोटाळा होता. अहवालात पहिला घोटाळा समोर आला आहे. पुढील काळात अनेक घोटाळे समोर येतील.
महामार्गाबाद्दल महसूल मंत्री म्हणून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, त्या दुरुस्त करण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग झाला पाहिजे. समृद्धी महामार्गासारखंच या महामार्गामुळे संपूर्ण चित्र बदलणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी सरकार सोडवेल. काम होणे महत्त्वाचे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.