chandrashekhar-bawankule : चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय, 47 अप्पर तहसील कार्यालयांचाही समावेश. सौजन्य : सोशल मीडिया
राज्यातील महत्त्वाच्या चार जिल्ह्यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. जनतेच्या सोयीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar-bawankule ) यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. बारामती, पंढरपूर, दापोली, नागपूर ग्रामीण येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालये उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या ठिकाणांचे प्रशासकीय विभाजन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त २१ जिल्ह्यात 47 नवीन अप्पर तहसील कार्यालयांची निर्मिती देखील करण्यात येणार आहे.
चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन होणार
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार राज्यातील चार जिल्ह्यांचे प्रशासकीय विभाजन करण्यात येणार आहे. यामध्ये बारामती, पंढरपूर, दापोली, नागपूर ग्रामीण या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर 21 जिल्ह्यांत 47 नवीन अप्पर तहसील कार्यालयांची निर्मिती देखील करण्यात येणार आहे. आता सरकारच्या या निर्णयावर लोकांची नेमकी काय भूमिका येणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ३ दिवसांत मदतीची पहिली अधिसूचना, कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची मोठी घोषणा
दरम्यान, प्रशासनाने पंढरपूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मंजुरी दिली आहे. या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून पंढरपूरसह 7 तालुक्यांचा प्रशासकीय कारभार हाताळला जाणार आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माढा, माळशिरस, करमाळा आणि मोहोळ या 7 तालुक्यांचा कारभार या अपर जिल्हाधिकारी कार्यालयातून होणार आहे.
पंढरपूर परिसरातील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी सोलापूर जिल्ह्याच्या मुख्यालयात जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी आता हे सर्व सोयीचे होणार आहे.
Girgaon Chowpatty: गणेश विसर्जन सोहळ्यात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग, पर्यटन विभागाचा अनोखा उपक्रम






