Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यातील Pune Jain House Land प्रकरणात धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय; 30 ऑक्टोबर पर्यंत…

मॉडेल कॉलनीतील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट व जैन मंदीर गहाण प्रकरणी सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणात, महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी महत्वाचा आदेश दिला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 28, 2025 | 09:07 PM
पुण्यातील Pune Jain House Land प्रकरणात धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय; 30 ऑक्टोबर पर्यंत…
Follow Us
Close
Follow Us:
जैन बोर्डिंग हाऊस जमीन प्रकरणात नवीन ट्विस्ट
या प्रकरणात धंगेकरांचे मंत्री मोहोळांवर गंभीर आरोप
गोखले बिल्डर्सकडून व्यवहार रद्द करण्याची मागणी
 

पुणे: मॉडेल कॉलनीतील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट व जैन मंदीर गहाण प्रकरणी सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणात, महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी दिलेला “स्टेटस को ” (सध्यस्थिती कायम ठेवण्याचा) आदेश ३०  ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आला आहे.

यापुर्वी, २० ऑक्टोबरला दिलेल्या प्राथमिक आदेशानुसार, ट्रस्टच्या मालमत्तेबाबत कोणतीही नवीन कारवाई किंवा बदल होऊ नये, असे निर्देश देण्यात आले होते. या आदेशाची मुदत आज संपत आल्याने, अर्जदारांच्या विनंतीनुसार धर्मादाय आयुक्तांनी तो पुढे वाढवण्याचा निर्णय घेतला.

या सुनावणीदरम्यान अर्जदारांच्या वतीने ॲड. योगेश पांडे यांनी बाजू मांडली. तर प्रतिवादी ट्रस्ट आणि गोखले लँडमार्क एलएलपी यांच्या वतीने अनुक्रमे ॲड. इशान कोल्हटकर आणि ॲड. एन. एस. आनंद उपस्थित होते. दोन्ही प्रतिवादींनी “स्टेटस को” आदेश वाढविण्याला कोणतीही हरकत घेतली नाही, याची नोंदही करण्यात आली.

धर्मादाय आयुक्तांनी दोन्ही प्रतिवादी पक्षांना त्यांचे उत्तर  सादर करण्यासाठी ३० ऑक्टोबर पर्यंतची मुदत दिली आहे. सेठ हिराचंद नेमचंद (एचएनडी) स्मारक ट्रस्ट हा जुना आणि प्रतिष्ठित ट्रस्ट असून, त्याच्या मालमत्तेच्या वापर व व्यवस्थापनाबाबत अलीकडच्या काळात वाद उद्भवला आहे. अर्जदारांनी काही व्यवहार आणि निर्णयांवर आक्षेप घेतला असल्याने धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गोखले बिल्डर्सचे Jain Boarding House Land प्रकरणातील 230 कोटी बुडणार; धर्मादाय आयुक्तांचा निर्णय काय?

या पार्श्वभूमीवर आजच्या आदेशामुळे ट्रस्टच्या संपत्तीबाबत कोणतेही बदल, हस्तांतरण किंवा नवे करार होणार नाहीत, अशी खात्री राहील. धर्मादाय आयुक्तांनी पुढील सुनावणीची तारीख ३० ऑक्टोबर निश्चित केली असून, त्यादिवशी दोन्ही बाजूंची मते आणि सादर केलेली कागदपत्रे विचारात घेतली जातील. या निर्णयामुळे सध्या ट्रस्टची स्थिती यथास्थित राहणार असून, पुढील सुनावणीत या प्रकरणाच्या पुढील दिशेबाबत अधिक स्पष्टता मिळण्याची शक्यता आहे.
या भूखंडावरील भगवान जैन मंदीर पतसंस्थांकडे गहाण ठेवल्याने देशभरातील जैन बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली होती. इतकेच नव्हे तर सत्ताधारी महायुतीतील नेते, मंत्री मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्यात जोरदार वाद निर्माण झाला होता. जैन समाजाच्यावतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली समाजबांधवांनी विश्वस्तांच्या निर्णयाला प्रखर विरोध केला होता.

Web Title: Charity commissioner orders status quo in jain boarding house land case mohol vs dhangekar pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 09:06 PM

Topics:  

  • murlidhar mohol
  • pune news
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

Pune News : बालगंधर्व कलादालनाला प्रचंड प्रतिसाद; इतर कलादालनांकडे होतंय दुर्लक्ष?
1

Pune News : बालगंधर्व कलादालनाला प्रचंड प्रतिसाद; इतर कलादालनांकडे होतंय दुर्लक्ष?

पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम! अहिल्यानगरमधील जैन समाज झाला आक्रमक
2

पुण्यातील जैन बोर्डिंगप्रकरणी स्टे कायम! अहिल्यानगरमधील जैन समाज झाला आक्रमक

पुण्यात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई; संशयित दहशतवाद्याला बेड्या
3

पुण्यात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई; संशयित दहशतवाद्याला बेड्या

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, तर…; काँग्रेसची मागणी
4

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही, तर…; काँग्रेसची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.