जैन बोर्डिंग प्रकरणावरून एकनाथ शिंदेंचा धंगेकरांचा सल्ला
धंगेकर यांनी जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये चांगलीच खळबळ उडाली असून, सहयोगी पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद उफाळल्याची चिन्हे दिसत आहेत. या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी धंगेकर यांना “विवेकाने निर्णय घ्या आणि पक्षातील संवाद मार्ग खुले ठेवा” असा महत्त्वाचा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींची मोठी चर्चा असून, जैन बोर्डिंग प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्याच्या दौऱ्यावर होते. जैन बोर्डींगच्या प्रकरणावर, रवींद्र धंगेकरांना तुम्ही काही सल्ला दिलाय का, असा सवाल विचारला असता एकनाथ शिंदे म्हणाले, “आपल्याला महायुतीमध्ये दंगा करायचा नाही. आता जैन बोर्डिंगचा विषय संपलेला आहे. धंगेकर यांना ज्या काही गोष्टींची माहिती मिळाली, त्यावरून ते बोलले. परंतु आता आपल्याला विरोधकांच्या हातात कोणतेही कोलित द्यायचे नाही, कारण महायुती एकत्र आहे आणि एकजुटीनेच पुढे जायचे आहे.” शिंदेंच्या या वक्तव्यामुळे जैन बोर्डिंग प्रकरणातील राजकीय तापमान काहीसे कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, धंगेकरांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत समन्वयाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदानाच्या ‘Thamma’ चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ,वर्ल्डवाइड १००
आमदार रवींद्र धंगेकर यांची भूमिका भाजपविरोधी नसल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “धंगेकर हे लढणारे कार्यकर्ते आहेत. ते अन्यायाविरोधात लढतात. त्यांनी आधीच स्पष्ट केले आहे की माझी भारतीय जनता पार्टीविरोधात कोणतीही भूमिका नाही. जे प्रकरण सुरू होते ते आता संपले. या विषयावर पडदा पडेल, अशी मला आशा आहे.” तसेच त्यांनी धंगेकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत, महायुतीमध्ये मतभेद निर्माण होणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला.






