मुंबई : सावरकर(Savarkar) यांचे शैक्षणिक योगदान काय? त्यावेळेसच्या पुरोहितांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांना (Rajshree shahu maharaj) वेदोक्त मंत्र नाकारले आताही वसतिगृहाला शाहूंचं नाव नाकारलं. आजही यांना शाहूंच्या नावाचं वावडं आहे. अशा संतप्त भावना व्यक्त करत छात्र भारतीने (Chatra Bharati) मुंबई विद्यापीठाचा (Mumbai University) निषेध केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने (administration) आंतरराष्ट्रीय विद्यार्थी (student) वसतिगृहाला राजर्षी शाहू महाराजांचे नाव द्यावे हा प्रस्ताव नाकारला आणि सावरकरांच्या नावाचा ठराव केला. याविषयावर मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या (Mumbai University Students) भावना तीव्र आहे. शाहू महाराजांचा (Shahu Maharaj) अवमान कदापि सहज करणार नाही. छात्रभारती तीव्र आंदोलन करणार, असा इशारा छात्र भारतीचे राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले (Rohit Dhale) यांनी दिला आहे.
[read_also content=”ठाकरे घराण्यातील ‘आणखी एका’ व्यक्तीची राजकारणात एन्ट्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन दर्शविला पाठिंबा https://www.navarashtra.com/maharashtra/nihar-thackeray-meet-to-cm-eknath-shinde-and-support-to-shinde-group-309549.html”]
दरम्यान, छत्रपती शाहू महाराजांवर विद्यापीठाने अन्याय केला आहे. राज्यपाल, कुलगुरु व व्यवस्थापन परिषदेने या निर्णयाचा पुर्नविचार करावा यासाठी छात्रभारतीने आज आंदोलन केलं. छात्र भारतीच्या आंदोलनाला अनेक समविचारी संघटनानी पाठिंबा दर्शवला आहे. सर्व समविचारी संघटना आणि शाहू प्रेमींनी एक ऑगस्ट रोजी मागणी परिषदेत सहभागी व्हावं असं आवाहन राज्य कार्याध्यक्ष रोहित ढाले यांनी केली. आजच्या निषेध आंदोलनाला छात्र भारतीचे कार्यध्यक्ष रोहित ढाले, सचिन बनसोडे, श्रीधर पेडणेकर, दीपाली आंब्रे, विकास पटेकर, शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे, ग्रॅज्युएट फोरमचे जालिंदर सरोदे, AISF चे अमीर काझी, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विकास मोरे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.