Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wikipedia: छत्रपती संभाजी महाराजांवरील वादग्रस्त माहितीमुळे, विकीपीडियाच्या संपादकांवर होणार FIR दाखल

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल विकिपीडिया पेजवर आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात प्रचंड संताप आहे आणि आता पोलिसांनी कारवाई करण्याची तयारी केली आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 21, 2025 | 02:55 PM
छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त लिखाणासाठी विकीपिडीयावर होणार कारवाई (फोटो सौजन्य - Pinterest)

छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त लिखाणासाठी विकीपिडीयावर होणार कारवाई (फोटो सौजन्य - Pinterest)

Follow Us
Close
Follow Us:

ओपन-सोर्स प्लॅटफॉर्म विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांवर लिहिलेल्या वादग्रस्त मजकुराच्या प्रकरणात मोठी माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र पोलिसांचा सायबर सेल विकिपीडियावरील त्या मजकुराच्या संपादकांवर एफआयआर दाखल करणार आहे. सूत्रांनी सांगितले की, महाराष्ट्र सायबर सेलने विकिपीडियाला मजकूर काढून टाकण्याबाबत १० हून अधिक ईमेल पाठवले होते परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

तसंच सूत्रांनी दिलेल्या माहिनुसार, विकिपीडियावरून फक्त स्वयंचलित उत्तर आले परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. विकिपीडियाने लिहिण्यात आलेला तो मजकूर काढून टाकला नाही किंवा पोलिसांना प्रतिसाद दिला नाही. याशिवाय, विकिपीडियाने IT कायद्याच्या कलम ६९ आणि ७९ चे उल्लंघन केले आहे. या प्रकरणात, विकिपीडियाच्या ४-५ संपादकांविरुद्ध एफआयआर दाखल केला जात आहे.

Rahul Gandhi : ‘तर भाजपचा विजय झालाच नसता’; राहुल गांधींनी सांगितलं नक्की काय ठरला होता प्लान अन् कोणामुळे फिस्कटला

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार कारवाई सुरू

खरंतर, हे पाऊल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने उचलण्यात आले आहे. संभाजी महाराजांबद्दल विकिपीडियावर असलेल्या आक्षेपार्ह माहितीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी कडक भूमिका घेतली होती. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर सेलला सूचनाही दिल्या होत्या. त्यांनी म्हटले होते की ते ओपन-सोर्स प्लॅटफॉर्मवर असे लेखन सहन करणार नाहीत. ज्यामध्ये तथ्ये विकृत पद्धतीने सादर केली जातात.

संभाजी महाराजांवर नुकताच प्रदर्शित झाला चित्रपट

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाच्या लाँचपासूनच छत्रपती संभाजी महाराजांचा मुद्दा चर्चेत आहे. महाराष्ट्रात या चित्रपटाला खूप पसंती दिली जात आहे कारण महाराष्ट्रात मराठा राज्यकर्ते छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांना आपले आदर्श मानतात आणि त्यांची पूजा करतात. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर विकिपीडियावरील मजकुरावरील वाद निर्माण झाला आहे.

Manikrao Kokate News : न्यायालयाने सुनावली दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

एफआयआर करून कारवाई

लवकरच विकीपीडियाच्या संपादकांवर एफआयआऱ दाखल होणार असल्याचे आता सांगण्यात येत आहे. तर हे प्रकरण दिवसेंदिवस चिघळत चालले असल्याचेही दिसून येत आहे. याकडे दुर्लक्ष न करता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रे फडणवीस यांनी तात्काळ पावले उचलत कारवाई करण्याची सूचना दिली आहे आणि त्यानुसार प्रशासन कामाला लागल्याचेही दिसून येत आहे. याशिवाय लवकरच याबाबत कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासनही काल मुख्यमंत्री यांनी दिले होते. यानुसार पोलिसांनी आपले काम तात्काळ करायला सुरूवात केली आहे. 

Web Title: Chhatrapati sambhaji maharaj cyber cell to lodge fir against wikipedia editors in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Chatrapati Sambhaji Raje
  • CM Devendra Fadanvis
  • maharashtra news

संबंधित बातम्या

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं
1

कोल्हापुरात मुसळधार पावसाचा गर्भवती महिलेला फटका; वेळेवर उपचार न मिळाल्याने भर पावसात झाली प्रसूती, बाळ दगावलं

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली
2

Maharashtra Rain Update: महाराष्ट्र पावसाचा कहर! समुद्र खवळला, नद्यांची पातळीही ओलांडली

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…
3

Maharashtra 1st Conclave 2025: महाराष्ट्राचे स्वप्न साकार करणारे व्यासपीठ…

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा
4

परभणीच्या येलदरी धरणासाठी पाऊस ठरला फायद्याचा; धरणात तब्बल 95 टक्के जलसाठा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.