Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार- देवेंद्र फडणवीस

संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 05, 2025 | 06:59 PM
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार- देवेंद्र फडणवीस

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक उभारणार- देवेंद्र फडणवीस

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: संगमेश्वर येथील ज्या सरदेसाई यांच्या वाड्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्यात आले त्याठिकाणी छत्रपती संभाजी महारांजांचे यथोचित स्मारक उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेमध्ये सांगितले. निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी चर्चेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सदस्य प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, पंकज भुजबळ, भावना गवळी, प्रसाद लाड यांनी सहभाग घेतला.

Ladki Bahin Yojana : “2100 रुपये लगेच नाहीत…,”, आदिती तटकरेंचं सभागृहात महत्त्वाचं वक्तव्य

संगमेश्वर येथील सरदेसाई यांच्या वाड्याची जागा कमी पडत असल्यास या स्मारकासाठी नजीकची आणखी काही जमीन अधिग्रहित करण्यात येईल असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक, शूर सेनापती, शौऱ्याचे प्रतिक होते. त्यांच्या पराक्रमाला साजेल असे स्मारक उभारण्याचा मानस आहे. छत्रपती संभाजी महारांजांच्या शौऱ्याविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले “देश धरमपर मिटने वाला। शेर शिवाका छावा था।। महा पराक्रमी परम प्रतापी। एकही शंभू राजा था॥” अशा शब्दात त्यांनी शौर्य वर्णन केले.

कर्नाटक येथील होदिगेरी येथील शहाजी महाराजांच्या समाधी परिसराची डागडुजी करून याठिकाणाचा विकास करण्यासाठी कर्नाटक सरकारला विनंती करण्यात येणार आहे. कर्नाटक सरकार त्यास राजी नसल्यास किंवा त्यांना ते शक्य नसल्यास सदर जागेचे महाराष्ट्र शासन स्वतः सुशोभिकरण करणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

जळगाव येथे शिवसृष्टी उभारण्यात येणार

नाशिक जिल्ह्यामध्ये चार ठिकाणी निफाड पिंपळगाव येवला शिवसृष्टीचे काम सुरू असून छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्कचे काम जळगाव येथे करण्यात येणार असल्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेमध्ये सांगितले. यावेळी देसाई म्हणाले, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने नाशिक ऐवजी जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील पाच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाच्या विविध घटनांवर आधारित डिजिटल थीम पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असेलेला जिजामातांचा वाडा 350 वर्षापूर्वी जसा होता तसा उभा करण्यात येणार आहे आणि त्याठिकाणीही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. सिंदखेड राजा येथील जिजामातांचे जन्मस्थान विकसित करण्यात येणार आहे, उमरठ येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार असल्याचेही मंत्री देसाई यांनी सांगितले.

औरंगजेबावरील विधानावरून अखेर अबू आझमींची माघार; उत्तर प्रदेशच्या विधानसभेत उमटले होते पडसाद

Web Title: Chhatrapati sambhaji maharaj memorial to be built at sangameshwar devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 06:59 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Maharaj
  • devendra fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?
2

Devendra Fadnavis Live : उद्धव ठाकरेंनी माझे 1000 रुपये वाचवले…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी का खेचली टेर?

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय
3

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन
4

Devendra Fadnavis News: दिल्लीची वाट न पाहता दिवाळीपूर्वी मदत देणार; देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.