
BJP Politics, BMC Election 2026, Eknath Shinde
मानापमान दाखवून मनपा निवडणुकीत भाजपाचे नुकसान करणाऱ्या शिंदेसेनेशी केलेली युती तोडा, अशा घोषणा देत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी मंत्री अतुल सावे आणि खा. डॉ. भागवत कराड यांना घेराव घालून त्यांची वाहने अडवून गोंधळ घातला. नेते कार्यकर्ते अन् पदाधिकाऱ्यांना विचारात घेत नसतील तर आम्हालाही निवडणुकीत आमचे ‘अवतार’ दाखवावे लागतील असा इशारा देत ‘बंडाळी’ होणार असल्याचा इशारा दिला. उमेदवारी दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस असून बंडखोरांना शांत करण्यासाठी पुन्हा नेत्यांना मैदानात उतरावे लागणार आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
महापालिका निवडणुकीत युती तुटल्याचा विषय राज्यभर गाजला. त्यांनतर तिकीट वाटपावरून भाजपमध्ये झालेले रणकंदन चांगलेच गाजले होते. अखेरीस युती तोडून भाजप शिंदे गट स्वबळावर लढले. आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही पक्षात युती झाल्याचे जाहीर झाले. मात्र, भाजपामधील एका गटाची प्रचंड नाराजी समोर आली. मंगळवारी या गटाने
मंत्री अतुल सावे यांच्यासह खा. भागवत कराड यांना घेराव घातला. यामुळे पक्षातील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून भविष्यातील बंडाळीचे संकेत यातून समोर आले आहेत. महापालिकेत युती तुटल्यानंतर तिकीट वाटपावरून इच्छुकांमध्ये चढाओढ पाहायला मिळाली होती. प्रसंगी बंडाळी करून अनेकांनी अपक्ष लढत भाजपाला आव्हान दिले. परिणामी पक्षाने अनेक इच्छुकांच्या काढून टाकले.
BMC Election 2026: सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार
युतीबाबत दोन दिवस झालेल्या बैठकीनंतर भाजप-शिवसेनेत मंगळवारी युती झाल्याचे जाहीर करण्यात आले. बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये बरीच वादावादी झाल्याचे समजते. खासदार संदीपान भुमरे यांचे कट्टर विरोधक असलेल्या दत्ता गोर्डे यांना भाजपाने कालच प्रवेश देत भुमरे यांच्यासमोर आवाहन देण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोडमध्ये भाजपाचे नामोनिशान
नसून त्यांच्याशी युती करण्याची गरज नाही. अशा मुद्यांवरुन आरोप प्रत्यारोप केले गेले असल्याचे समजते. अशातच दोन्ही पक्षांकडून जादा जागांची मागणी केली गेली. दरम्यान, भाजपाची ऑफर न पटल्याने चिडून, नाराज होऊन पालकमंत्री संजय शिरसाट यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत दालनाबाहेर पाऊल टाकले होते. मात्र, खा. संदीपान भुमरे यांनी त्यांची समजूत काढत त्यांना परत बैठक खोलीत आणले.
दरम्यान, युतीची घोषणा झालेली असताना दालनाबाहेर आल्यानंतर भाजपच्या वैजापूर कार्यकर्त्यांनी युतीला तीव्र विरोध केला. ‘युती नको, युती तोडा’च्या घोषणाबाजी करत कार्यकत्यांनी मंत्री अतुल सावे आणि खा. भागवत कराड यांना घेराव घातला. ही घटना पुढील नाराजीनाट्याची नांदी ठरू शकते असे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. महापालिका वेळीही काहींनी उपोषण तर काहींनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. ती नाराजी दूर करताना भाजप नेत्यांना चांगलाच घाम फुटला होता.