BMC Election 2026: सत्तावाटपाचे नवे समीकरण; मुंबईच्या बदल्यात नाशिक, एकनाथ शिंदे तडजोड करण्यास तयार
BMC Election 2026: राज्यातील महापालिका निवडणुकीनंतर आता महापालिकांवर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे सेनेतील वाटाघाटी सुरू आहेत. तर दुसरीकडे आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणीदेखील होणार आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
मुंबईत भाजपला पाठिंब्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत वाटा दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबईप्रमाणे नाशिकमध्येही भाजपने महापौरपदावर दावा ठोकला आहे. पण त्यानंतरही भाजपकडून नाशिक महापालिकेत शिंदे गटाला वाटा देण्याबाबत तडजोड केली जात असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील निर्णय लांबणीवर; ‘या’ दिवशी पुन्हा सुनावणी
मुंबईत भाजप–शिवसेना युती झाली होती. तर नाशिकमध्ये भाजप विरूद्ध शिवसेना-राष्ट्रवादी अशी लढत झाली होती. पण मुंबईतील महापौरपदासाठी भाजप आणि शिंदे गटात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. हा तणाव निवळण्यासाठी भाजपने नाशिकमध्ये तडतोड करण्याची तयारी दाखवली असल्याचे बोलले जात आहे.
मुंबई महापौरपद भाजपकडे राहिल्यास नाशिकमध्ये शिंदेंसाठी तडजोड
पण त्याचवेळी मुंबई महापालिकेतील महापौरपद पाच वर्षांसाठी आपल्याकडेच ठेवण्याबाबत भाजप पूर्णपणे ठाम आहे.दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना महापौर पद शिंदे गटाला न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण दुसरीकडे मुंबई महापालिकेतील महापौर पदाच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत तडजोड केली जाऊ शकते.
नाशिकमध्ये शिंदे गटाला उपमहापौर, स्थायी समिती सदस्य, प्रभाग समित्या व विषय समित्यांची पदे सेनेला दिली जाऊ शकतात. या वाटाघाटी होणार आणखी काही वेगळे निर्णय घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई आणि नाशिक महापालिका: सत्तावाटपाचे नवे समीकरण?*
मुंबई महानगरपालिकेतील सत्तास्थापनेसाठी भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाटाघाटींनी आता वेग घेतला आहे. मुंबईत भाजपला पाठिंबा दिल्यास, त्याच्या बदल्यात नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत वाटा मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
मुंबईतील महापौरपदावरून दोन्ही पक्षांमध्ये सध्या पेच निर्माण झाला आहे. शिवसेना अडीच वर्षांच्या कालावधीसाठी महापौरपदाची मागणी करत आहे, तर भाजप पाचही वर्षे हे पद स्वतःकडे ठेवण्यावर ठाम आहे.
नाशिकमध्ये भाजप स्वबळावर सत्तेचा दावा करत असली, तरी मुंबईतील समीकरणांसाठी दोन्ही बाजूंनी तडजोडीचे संकेत दिले आहेत. जर मुंबईत महापौरपद भाजपकडे राहिले, तर नाशिकमध्ये शिवसेनेला सत्तेत महत्त्वाचा वाटा मिळू शकतो.
महापौरपद: भाजपकडे राहण्याची दाट शक्यता.
शिवसेनेला मिळणारी संभाव्य पदे: उपमहापौरपद, स्थायी समिती सदस्यत्व, प्रभाग समित्या आणि विविध विषय समित्यांची जबाबदारी.
पुढील काही तासांत दोन्ही शहरांतील सत्तासमीकरणांचे चित्र पूर्णपणे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या तडजोडीमुळे राज्यातील आगामी राजकारणाला नवी दिशा मिळू शकते.






