Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire:आगीची माहिती समजताच रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि पोलिसांनी समन्वयाने बचावकार्य सुरू केले. विशेष काळजी घेऊन नवजात बालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. वेळेत करण्यात आलेल्या या बचावकार्यामुळे मोठा अनर्थ टळला

  • By anuradha sagar
Updated On: Sep 04, 2026 | 10:25 AM
PICU, Chhatrapati Sambhajinagar, Asian Hospital, Hospital Fire,

PICU, Chhatrapati Sambhajinagar, Asian Hospital, Hospital Fire,

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटलच्या PICU विभागाला मध्यरात्री अडीच वाजता आग
  • बाल अतिदक्षता विभागात (PICU) उपचार घेणारी ९ नवजात बालके सुखरूप
  • रुग्णालयातील एकूण ५५ रुग्णांना इतरत्र सुरक्षित स्थळी हलवण्यात यश
Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire:  छत्रपती संभाजीनगर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आकाशवाणी चौक परिसरातील एशियन हॉस्पिटलमधील बाल अतिदक्षता विभागाला (PICU) रात्री अडीचच्या सुमारास अचानक आग लागली. त्यावेळी या विभागात 9 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. आग लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासन, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. प्रसंगावधान राखत सर्व 9 नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

आगीची माहिती मिळताच रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने रुग्णवाहिका दाखल झाल्या. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातील 55 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. नवजात बालकांची प्रकृती लक्षात घेऊन त्यांना पुढील उपचारांसाठी घाटी रुग्णालयासह इतर खासगी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आले.

WhatsApp Update: आता व्हॉट्सॲपवरूनच भरा पाणी आणि क्रेडिट कार्डच बिल

डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह पोलिसांचे तातडीने बचावकार्य

आगीची माहिती समजताच रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आणि पोलिसांनी समन्वयाने बचावकार्य सुरू केले. विशेष काळजी घेऊन नवजात बालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. वेळेत करण्यात आलेल्या या बचावकार्यामुळे   सर्व 9 बालकांना वाचवण्यात रुग्णालय प्रशासनाला यश  आले. बचावकार्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सर्व बालके सुरक्षित असल्याची माहिती दिली.  त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

या घटनेनंतर बालकांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मध्यरात्री अचानक घडलेल्या या घटनेमुळे काही काळ रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Thane News: ठाण्यात दहीहंडीच्या मडक्यांना मोठी मागणी; महागाईमुळे यंदा किमतीत किमान ५० रुपयांची वाढ

आग नेमकी कशामुळे लागली?

एशियन हॉस्पिटलच्या PICU विभागाला आग नेमकी कशामुळे लागली,  आगीमुळे विभागाचे नेमके किती नुकसान झाले, याचीही माहिती समोर आलेली नाही. अग्निसुरक्षा व्यवस्थेची पाहणी तसेच आगीच्या कारणांचा तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, अमरावती येथील सरकारी रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU मध्ये आग लागल्याने रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

अमरावतीच्या घटनेनंतर पुन्हा फायर ऑडिटची मागणी

गेल्या आठवड्यात अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला.त्यानंतर आगीने वेगाने कक्षाला वेढले आणि तीन बालकांचा होरपळून मृत्यू झाला.  पहाटेच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्यानंतर आग लागल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच आता संभाजीनगर मध्येही अशी घटना घडल्याने  आता फायर ऑडिटची मागणी जोर धरू लागली आहे.

या घटनेनंतर रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. आता छत्रपती संभाजीनगरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करून अग्निसुरक्षा उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी पुन्हा जोर धरत आहे.

Web Title: Chhatrapati sambhajinagar asian hospital picu fire breakout 55 patients rescued

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Fire

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
1

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक
2

Ganesh Idol Factory Fire: वाई MIDCमध्ये गणेशमूर्ती कारखान्याला भीषण आग; लाखो रुपयांचा माल जळून खाक

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral
3

‘जिगरबाज ड्रायव्हर!’ निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.