
'जिगरबाज ड्रायव्हर!' निवासी भागात ट्रकला लागली भीषण आग; स्वतःचा जीव धोक्यात घालून रोखला अनर्थ; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओतील ही घटना महेश्वरी-सहरनपूर रस्त्यावर घडल्याचे सांगण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा घरे, दुकाने आणि लोकांची वर्दळ दिसत आहे. अशा दाट लोकवस्तीच्या ठिकाणी जळता ट्रक थांबवणे हा एक मोठा धोका ठरू शकला असता. ट्रकवर लादलेला सुका गवत आगीच्या ज्वाळांमध्ये जळून खाक होत होता ज्यामुळे परिस्थिती गंभीर झाली होती. यात ट्रकला आग लागण्याचीही शक्यता होती. असं असूनही ट्रक ड्रायव्हरने मात्र आपला जीव धोक्यात घातला आणि रस्त्याच्या मधोमध ट्रकला सोडून न जाता वस्तीपासून दूर ट्रकला घेऊन तो पुढे गेला.काही लोकांनी दावा केली की, त्याने पुढे हा ट्रक अग्निशमन केंद्रावर नेला. तथापि, घटना नेमकी कधी घडली आणि आग लागण्याचे कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
व्हिडिओमध्ये आपल्याला जळता ट्रक रस्त्यावरुन वेगाने धावताना दिसून येईल. ट्रकमधील जळते गवत यावेळी रस्त्यावर देखील पडत होते. ट्रकमधून येणारा धूर आणि आगीचे ते दृष्य पाहून अनेकांना धक्का बसला तर काहींनी याचा व्हिडिओ आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला. यातीलच एकाने या घटनेचे फुटेज सोशल मिडियावर शेअर केले आहे.
Such brave people are only found in India
A truck load of grass caught fire in middle of residential area .
The driver took the risk of driving it away from the residential area, and seems instead of calling fire engines, he went to fire station with the truck. pic.twitter.com/0RwaW8SLuJ — Woke Eminent (@WokePandemic) August 28, 2026
‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral
दरम्यान या घटनेचा हा व्हिडिओ @WokePandemic नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. एका यूजरने म्हटले की, ड्रायव्हरने स्वतःचा जीव धोक्यात घालून मोठा अपघात टाळला, खरंच कौतुकास्पद!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, पण त्या ट्रकला आग लागली कशी?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लोकवस्तीपासून ट्रक दूर नेणं हा खरंच योग्य निर्णय होता”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.