Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा! गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामांच्या बेटरमेंट चार्जेसमध्ये १००% सूट

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर महापालिकेने गुंठेवारी क्षेत्रातील ३०० चौ. मी. पर्यंतच्या बांधकामांवरील बेटरमेंट चार्जेस पूर्ण माफ केले आहेत. १५ सप्टेंबरपर्यंत खुल्या भूखंडांच्या नियमितीकरणावर ५०% सूट मिळेल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 29, 2026 | 02:11 PM
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा!

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा!

Follow Us
Follow Us:
  • छत्रपती संभाजीनगरकरांना मोठा दिलासा!
  • गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामांच्या बेटरमेंट चार्जेसमध्ये १००% सूट
  • वाचा सविस्तर बातमी!
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरकरांना शहरातील गुंठेवारी क्षेत्रातीलअनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. ३०० चौरस मीटरपर्यंतच्या निवासी बांधकामांना नियमितीकरण करताना बेटरमेंट चार्जेस (विकास आकार) पूर्णपणे माफ करण्यात आले आहेत. तसेच खुल्या भूखंडांच्या नियमितीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत विकास आकारात ५० टक्के सवलत देण्यात येणार असून, यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेने प्रसिद्ध केले आहे.

राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत झालेल्या अनधिकृत बांधकामांचे गुंठेवारी कायद्यानुसार नियमितीकरण करण्यास मान्यता दिल्यानंतर महापालिकेकडून योजना राबविली जात आहे. सर्वसाधारण सभेच्या निर्णयानुसार ही योजना १ मे ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीपर्यंत सुरू ठेवण्यात आली असून, या मुदतीत विकास आकाराच्या शुल्कात विशेष सवलती लागू करण्यात आल्या आहेत. गुंठेवारी क्षेत्रातील ३०० चौरस मीटर (सुमारे ३,२२८ चौरस फूट) क्षेत्रफळापर्यंतच्या घरांसाठी नियमितीकरणावेळी बेटरमेंट चार्जेस आकारले जाणार नाहीत.

वाढीव बांधकामावर रेडीरेकनरच्या १० टक्के दंडाची तरतूद

मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त बांधकाम झाल्यास तेही नियमित करण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. मात्र अशा अतिरिक्त बांधकामासाठी संबंधित भागाच्या रेडीरेकनर दराच्या १० टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. एफएसआयशी संबंधित १.६० पर्यंतची पूर्वीची सवलत कायम ठेवण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: त्रुटी दूर करा अन् वेळेत पाणी द्या! विभागीय आयुक्तांनी यंत्रणांना दिल्या आढावा बैठकीत सूचना

खुल्या भूखंडांसाठी दोन टप्प्यांत सवलत

अनधिकृत अभिन्यासातील खुल्या भूखंडांच्या नियमितीकरणासाठी विकास आकारात टप्प्याटप्प्याने सवलत देण्यात येणार आहे. ० ते ४५० चौ. मीटरपर्यंतच्या भूखंडांना १५ सप्टेंबरपर्यंत ५० टक्के सवलत, त्यानंतर ३१ ऑक्टोबरपर्यंत २५ टक्के सवलत मिळेल. ४५० ते ३,९९९ चौ. मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडांनाही याच प्रमाणात सवलत लागू राहील. मात्र अशा नियमितीकरणासाठी यूडीसीपीआरमधील नियमानुसार किमान १० टक्के खुली जागा राखणे बंधनकारक असेल.

३०० चौ. मीटरपेक्षा मोठ्या बांधकामांसाठीही दिलासा

३०० चौरस मीटरपेक्षा अधिक आणि २ हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामांसाठी बांधकामाच्या क्षेत्रावर विकास आकार पूर्णपणे माफ करण्यात आला आहे. मात्र उर्वरित खुल्या भूखंडाच्या क्षेत्रासाठी नियमानुसार विकास आकार भरावा लागणार आहे.

४५० चौ. मीटर भूखंड नियमितीकरणाचा खर्च निम्म्यावर

महापालिकेने निश्चित केलेला बेटरमेंट चार्ज प्रति चौरस मीटर १,८३७ रुपये आहे. ५० टक्के सवलतीमुळे ४५० चौरस मीटरच्या भूखंडाचे नियमितीकरण करण्यासाठी आता ४ लाख १३ हजार ३२५ रुपये भरावे लागतील. यापूर्वी याच भूखंडासाठी ८ लाख २६ हजार ६५० रुपये शुल्क आकारले जात होते. त्यामुळे नागरिकांना सुमारे चार लाख रुपयांचा थेट लाभ मिळणार आहे.

Abdul Sattar: सिल्लोडमध्ये आमदार अब्दुल सत्तार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; ‘शासकीय योजनांमध्ये अडवणूक अन्…’

Web Title: 100 waiver on betterment charges for unauthorized constructions under the gunthewari scheme in chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • property

संबंधित बातम्या

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना
2

Paithan: मंत्री अतुल सावेंच्या मोठ्या भावासह पुतण्याला मारहाण; शेती-रस्त्याच्या वादातून घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.