
श्वानप्रेमींसाठी दिलासादायक! ७५० चा परवाना आता फक्त 'इतक्या' रुपयांत (Photo Credit - X)
दरात झालेली मोठी घट
मनपा अंतर्गत कार्यरत असलेल्या पशुसंवर्धन विभागाने श्वान परवाना नोंदणीत वाढ व्हावी यासाठी, त्याची फी कमी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीकडे सादर केला होता, ज्यास आयुक्तांनी मंजुरी दिली आहे.
दरात झालेला बदल (नवीन दर १ एप्रिल ते ३१ मार्च या वार्षिक कालावधीसाठी):
| तपशील | जुने दर (२०२३ पासून) | नवीन दर |
| नवीन श्वान परवाना | ₹ ७५० | ₹ २०० (रेबीज व्हॅक्सिनसह) |
| नूतनीकरण (वार्षिक) | ₹ ५०० | ₹ १०० |
| नूतनीकरण विलंब शुल्क | ₹ ७५० | ₹ ५० प्रतिमाह |
| विना परवाना श्वानास पकडण्याचा खर्च | (माहिती नाही) | ₹ ३,००० (परवाना शुल्कासह) |
मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियमांतर्गत हा वार्षिक श्वान परवाना देण्यात येत असून, मनपा हद्दीतील सर्व पाळीव श्वानांना परवाना काढणे बंधनकारक आहे. या दर कपातीमुळे श्वान मालकांचा मोठा आर्थिक भार हलका होणार आहे.