मराठवाड्याला बुलेट गती! (Photo Credit - X)
जालना उपविभागातील शेतकऱ्यांकडून २१ नोव्हेंबरपर्यंत हरकती व आक्षेप मागवण्यात आले आहेत. आता पुढील टप्प्यात ही संपूर्ण प्रक्रिया वेगाने पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या दुहेरीकरण प्रकल्पामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-नांदेड रेल्वे दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामांना चालना मिळेल. लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रकल्प प्राधान्य यादीत आला आणि आता प्रत्यक्ष कामाला गती मिळू लागली आहे.
रेल्वे रुळाच्या लगत असणाऱ्या जमिनीची संयुक्त मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यावर आधारित अंतिम अधिसूचना जारी केली जाईल. त्यानंतर जमिनीचे दर निश्चित होऊन बाधितांना मोबदला मिळेल, रेल्वे रुळालगतची मोजणी असल्याने प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होईल, अशी माहिती उपविभागीय अधिकारी रामदास दौंड यांनी दिली.
अनेक गावातील जमीन संपदित होणार
जालना तालुका अंदाजे २०. २६ हेक्टर जमीन दरेगाव, हिस्वन बु., कारला, लोंड्याची वाडी, माळीपिंपळगाव, ममदाबाद, पाचनवडगाव, रोहनवाडी, बदनापूर, दावलवाडी, मात्रेवाडी, रामखेडा, शेलगाव, वरुडी, गोकुळवाडी
परतूर उपविभाग अंदाजे ७ हेक्टर जमीनआनंदवाडी, परतूर, खांडवी, उस्मानपूर, रायपूर, सातोना खु… सिरसगाव, मसला या गावांतील जमिनी मार्गदुहेरीकरणासाठी संपादित केल्या जाणार असून, बाधितांना ठरावीक दराने मोबदला मिळणार आहे.
या कामामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांतील प्रवास अधिक जलद होणार आहे. शेतमाल आणि औद्योगिक माल वाहतुकीला गती मिळणार असून उद्योगांसाठीही हा प्रकल्प सुवर्णसंधी राहणार आहे. लॉजिस्टिक पार्क, कोल्ड स्टोरेज, गोदामे, नवे उद्योग येण्यास चालना मिळणार आहे.
मराठवाड्यासाठी विकासाचा नवा महामार्ग
या प्रकल्पामुळे केवळ रेल्वे वाहतुकीचाच नाही, तर संपूर्ण मराठवाड्याच्या औद्योगिक, कृषी आणि बाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार आहे. २१७९ कोटींच्या या दुहेरीकरणामुळे मराठवाड्याचा विकास अनेक पटीने वेगाने होण्याची अपेक्षा आहे.






