Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambadas Danve: नवीन इमारतीला फर्निचर हवेच, सतरंज्यांवर…? जिल्हा परिषद फर्निचर वादावर अंबादास दानवेंचे रोखठोक वक्तव्य

Ambadas Danve News: इमारत झालीय तर फर्निचर हवेच, सतरंज्यांवर बसणार का?" छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेतील फर्निचर वादावर आमदार अंबादास दानवेंचे रोखठोक वक्तव्य; वाचा सविस्तर वृत्त.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 04, 2026 | 02:38 PM
Ambadas Danve

Ambadas Danve

Follow Us
Follow Us:
  • नवीन इमारतीला फर्निचर हवेच, सतरंज्यांवर…?
  • जिल्हा परिषद फर्निचर वादावर अंबादास दानवेंचे रोखठोक वक्तव्य
  • वाचा सविस्तर बातमी!
Chhatrapati Sambhajinagar: नवीन इमारत झाली म्हणजे चांगले फर्निचरही व्हायलाच हवे, रिकाम्या जागेवर सतरंज्या टाकून तर बसता येणार नाही. इमारतीवर जर एवढा खर्च होत असेल तर त्या इमारतीला साजेस फर्निचरदेखील करायला हवे, त्यामुळे याला कोणीही सपोर्ट आणि विरोध करण्याचे कारण नसावे, अशी भूमिका आ. दानवेंनी (Ambadas Danve) व्यक्त केली.

आ. अंबादास दानवे यांनी सोमवारी (०३) जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. दानवे म्हणाले, जिल्हा परिषदेत अध्यक्ष आणि सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा करायला मी आलो होतो. जलजीवन मिशन, पिण्याचा पाण्याचा आणि शिक्षणाचा, आरोग्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सध्या स्थिती काय आहे हे जाणून घेण्यासाठी ही बैठक होती. यावेळी त्यांनी झेडपी संदर्भात विविध विषयांवर आपले मुद्दे मांडले.

जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या फर्निचरसाठी सेस फंडातून खर्चासाठी सदस्यांमध्ये मतभेत आहेत. सेस फंडातील निधी फर्निचर खरेदीऐवजी शाळांच्या दुरुस्तीसाठी खर्च व्हावा. जिल्ह्यातील शाळांची दुरवस्था आहे मात्र इमारतीच्या फर्निचरवर कोट्यवधींचा खर्च करू नये असे काही सदस्यांचे म्हणणे आहे. यावर दानवे म्हणाले, शाळेची दुरुस्तीही गरजेची आहे मात्र नवीन फर्निचरही तितकेच गरजेचे आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सभापती, सदस्य रस्त्यावर तर बसू शकत नाही. ते जर नीट बसले तरच ते इतरांना नीट करू शकतील. शाळांची दुरुस्ती डीपीसी किंवा सीएसआर मधूनही होऊ शकते मात्र फर्निचरसाठी हा निधी मिळत नाही. त्यामुळे या विरोधाला काही अर्थ नसल्याचे दानवेंनी यांनी स्पष्ट केले.

Jayakwadi Dam Water Level: जायकवाडी ८० टक्क्यांच्या उंबरठ्यावर! ५० हजार क्युसेकने पाण्याची आवक; मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली

डीपीसी निधीवर झेडपी अध्यक्षांचाही अधिकार

डीपीसीचा निधी आमदारांना देण्याबाबत आ. दानवे म्हणाले, हा निधी कोणाच्याही व्यक्तिगत मालकीचा नाही. पालकमंत्र्यांच्या
तर मुळीच नाही. डीपीसीचा सहअध्यक्ष झेडपीचा अध्यक्ष असतो. त्यामुळे जेवढा पालकमंत्र्यांना अधिकार आहे तेवढाच जिप अध्यक्षांनाही अधिकार आहे. जो निधी जिपचा आहे तो जिपला सरळ वितरित करायला हवा. आतापर्यंत हे काम व्हायला हवे होते. जिपत निवडून आलेले आपलेच लोक आहेत. त्यांना सक्षम समजा. निधीचे नियोजन त्यांना करू द्यावे अशी भूमिका दानवेंनी स्पष्ट केली.

तीन महिन्यात परीक्षा कशी घेणार ?

दानवे म्हणाले, हे मिनी मंत्रालय आहे. येथेपच वर्ष काम करूनही समाधान होत नाही, त्यामुळे मिळालेल्या वेळेत चांगल्यात चांगली कामे करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. म्हणून आज आढावा घेतला. पाच वर्षांचा कार्यकाळ असताना तीनच महिन्यात कोणाची परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे आजच्या बैठकीत पूर्ण समाधानी नसलो तरी असमाधानी नाही, असे आ. दानवे यांनी स्पष्ट केले, शिंदे सेनेच्या गटनेत्यांना स्वतंत्र कैबिन भेटल्या मात्र उबाठा गटाला अद्याप कॅबिन मिळाले नाही यावर दानवे म्हणाले, कार्यालय तर मिळायलाच हवे. शिंदे गटाला केबिन मिळतात मात्र आम्हाला का नाही. केबिन नाही मिळाले तर रस्त्यावर मंडप टाकून बसू, अशी मिश्किल टिप्पणी दानवे यांनी केली.

Abhijeet Dipke on Amit Shah: ‘अमित शाह यांच्या आदेशावरूनच…’, अभिजीत दीपके यांचा खळबळजनक आरोप, तर केंद्र सरकारवरही टीकेचे बाण

Web Title: Ambadas danve chhatrapati sambhajinagar zp review meeting furniture controversy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Chhatrapati Sambhajinagar
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
1

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
2

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला
3

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.