Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला

मराठी माझी आई तर हिंदी माझी मावशी’ या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. अंबादास दानवेंनी ‘माय मरो पण मावशी जगो’ म्हणत फडणवीसांना टोला लगावला.

  • By विवेक
Updated On: Sep 14, 2026 | 08:08 PM
फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला

फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला

Follow Us
Follow Us:
  • ‘मराठी माझी आई, हिंदी माझी मावशी’; फडणवीसांचं भाषाविषयक वक्तव्य
  • ‘माय मरो पण मावशी जगो’; अंबादास दानवेंचा खोचक टोला
  • अमित शाहांच्या उपस्थितीत हिंदी दिवसाच्या कार्यक्रमात फडणवीसांचं भाषण
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी आणि हिंदी भाषेबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा चर्चेत आला आहे. नवी मुंबईतील वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात हिंदी दिवस आणि हिंदी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित होते.

यावेळी फडणवीस यांनी मातृभाषेच्या महत्त्वावर भाष्य करताना मराठी भाषेला आईची तर इतर भारतीय भाषांना मावशीची उपमा दिली. आईचा गौरव करताना मावशीचाही सन्मान केला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

अंबादास दानवेंचा खोचक टोला

फडणवीसांच्या या विधानावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली. ‘मराठीत एक म्हण आहे. माय मरो पण मावशी जगो..! बरोबर ना फडणवीस साहेब’, असं म्हणत दानवेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

दानवेंच्या या विधानामुळे मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा शाब्दिक संघर्ष रंगण्याची शक्यता आहे. आता भाजपकडून या टीकेला काय उत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

अमित शाहांनीही भाषांवर मांडली भूमिका

दरम्यान, हिंदी संमेलनात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतातील प्रत्येक भाषा समृद्ध करण्याची भूमिका मांडली. देशातील सर्व भाषांचा विकास आणि परस्पर सन्मान महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं.

शाह यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या भाषाविषयक योगदानाचाही उल्लेख केला. सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक तर होतेच, पण त्यांच्या काळातील विद्वान भाषाशास्त्रज्ञही होते, असं शाह यांनी नमूद केलं.

एकीकडे फडणवीसांनी मराठी आणि हिंदी भाषेच्या नात्याची उपमा देत सर्व भाषांचा सन्मान करण्याचं आवाहन केलं, तर दुसरीकडे अंबादास दानवेंनी त्याच विधानावरून मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला. त्यामुळे हा भाषेचा मुद्दा आता महाराष्ट्राच्या राजकारणात किती रंगतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा

Web Title: Devendra fadnavis marathi mother hindi aunt ambadas danve reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 08:08 PM

Topics:  

  • Ambadas Danve
  • Amit Shah
  • CM Devendra Fadnavis

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
1

Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Amit Shah -Eknath Shinde Meeting:  अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता
2

Amit Shah -Eknath Shinde Meeting: अमित शाहांची पुन्हा एकनाथ शिंदेंसोबत गुप्त बैठक; भाजपच्या गोटात अस्वस्थता

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा
3

Amit Shah UCC Statement : अमित शाहांचा मोठा दावा! लवकरच लागू करणार समान नागरी कायदा

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा
4

Amit Shah : ‘2014 आधी देश भ्रष्टाचार-जातीवाद-परिवारवादाने ग्रासला होता’; शाहांचा मोदींच्या 25 वर्षांच्या कारकिर्दीवर मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.