Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबे खाताय जरा जपूनच? पिवळाधमक पण आरोग्याला ठरू शकतो हानिकारक

कॅल्शिअम कार्बाईडमध्ये पिकवलेले आरोग्यासाठी घातक आंबे खाण्याऐवजी घरच्या घरी आंबे पिकवून खाणे केव्हाही चांगले. मात्र, असे नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खाण्यासाठी आपल्याला थोडा त्रास घ्यावा लागेल.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2026 | 03:30 PM
आंबे खाताय जरा जपूनच? पिवळाधमक पण आरोग्याला ठरू शकतो हानिकारक

आंबे खाताय जरा जपूनच? पिवळाधमक पण आरोग्याला ठरू शकतो हानिकारक

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : अक्षयतृतीयेपासून आंबे खाण्याला सुरुवात झाली. आमरस पुरणपोळी अनेकांच्या आवडीचा पदार्थ. ऊन्हाळ्याच्या दिवसात आमरसावर ताव मारण्याचा आनंद काही औरच म्हणावा. मात्र, हा आनंद घेताना आंबे काळजीपूर्वक खरेदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजारात बहुतांश आंबे लवकर आणण्याच्या नादात कॅलशियम कार्बाईडचा वापर करुन कृत्रिमरित्या पिकवलेले दिसत असून, असे आंबे आरोग्यासाठी घातक आहेत. यासाठी कच्चे आंबे घरी आणून घरच्या घरी पिकवण्याचा आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खाण्याचा आनंद आमरस प्रेमींना घेता येईल. यामुळे आंबे खरेदी करताना वरच्या चकचकीत रंगाला भाळून जाऊ नये, असे ते म्हणाले.

कॅल्शिअम कार्बाईडमध्ये पिकवलेले आरोग्यासाठी घातक आंबे खाण्याऐवजी घरच्या घरी आंबे पिकवून खाणे केव्हाही चांगले. मात्र, असे नैसर्गिकरित्या पिकवलेले आंबे खाण्यासाठी आपल्याला थोडा त्रास घ्यावा लागेल. जाधववाडी येथील मार्केटमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात कच्चे आंबे विक्रीसाठी आणतात. याशिवाय, बागातदार शेतकऱ्यांकडून थेट शेतातूनही कच्चे आंबे आणून वाळलेले गवत, ऊसाचे पाचट, झाडांची पाने किंवा यापैकी काहीच मिळाले नाही तर पेपरच्या रद्दीमध्ये हे आंबे ठेवून द्यावे.

Maharashtra Weather : विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; राज्यावर दुहेरी संकट, पुढील काही तास धोक्याचे, काय आहे IMD चा अंदाज?

दरम्यान, आंब्याला पाचट, गवताची माती लागून ते धुरकट होतात. यासाठी बाजारात फळे पिकवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यताप्राप्त असलेले इथेल किंवा बावीस्टीनचा वापर करावा. आंबे गवत कियाा ऊसाच्या पाचटामध्ये पिकायला ठेवण्यापूर्वी प्रति लिटर पाण्यात सवा ते दीड मिलीलिटर इथ्रेल मिसळावे. त्या पाण्यात आंबे पाच ते दहा मिनीटे बुडवावे आणि मग पिकायला घालावे. साधारण आंबे ९ ते १० दिवसात पिकतात. या प्रक्रियेमुळे दोन दिवस आधी आंबे पिकतात. तसेच इथ्रेलबरोबर एक ग्रॅम बाविस्टीन किंवा बेनोमील मिसळल्यास आंबे देठाजवळ सडणार नाहीत.

नैसर्गिक आंब्याच्या फळाची चव असते गोड

आंबे पिकवण्यासाठी गवत किंवा ऊसाचे पाचट मिळत नसेल तर रद्दी पेपरमध्येदेखील चांगल्याप्रकारे पिकवता येतात. जमिनीवर गोणपाट अंधरून त्याच्यावर रद्दी पेपरचे तीनचार थर टाकावे. त्याच्यावर आंबे ठेवून धरावर थर ठेवावे आणि पुन्हा चारही बाजून आंबे रद्दी पेपरने झाकून घ्यावे. आंब शक्यतो जिथे फार तापमान नाही अशा ठिकाणी पिकवले तर त्या फळाला चांगली चव आणि रंग येतो असे डॉ. कापसे यांनी सांगितले.

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या नसतो आंब्याला ग्लो

नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्याला ग्लो नसतो. तो पिवळा धमक दिसण्याऐवजी हिरवट पिवळा दिसतो म्हणजेच साधारणतः फिकट रंग असतो त्यावर चमक नसते तर सुरकुतलेपणा असतो. फळातील गर पिकल्यामुळे बोटाने दाबताच नरम जाणवतो. सालीवर चट्टे न पडता तो बरेच दिवस चांगला राहतो. नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा रसाळ आणि चवीला अतिशय गोड लागतो.

Web Title: Bright yellow mango yet it can prove harmful to health be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Agricultural Produce Market Committee
  • Chhatrapati Sambhajinagar News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.