Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: रिक्षाचालक संकटात! गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला; भाडेवाढीसाठी RTO कडे धाव

छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालक अडचणीत. मीटरचे दर वाढवण्यासाठी आरटीओकडे प्रस्ताव. २४ हजार रिक्षाचालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 02:46 PM
रिक्षाचालक संकटात! गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला (photo Credit- X)

रिक्षाचालक संकटात! गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला (photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • रिक्षाचालक संकटात!
  • गॅस दरवाढीमुळे उत्पन्नाचा ताळमेळ बिघडला
  • भाडेवाढीसाठी RTO कडे धाव
LPG CNG Price Hike Sambhajinagar: ऑटो रिक्षांसाठी एलपीजी आणि सीएनजी गॅस मिळत आहे मात्र एजन्सीजकडून तुटवडा असल्याचा भ्रम निर्माण करत आहेत. यामुळे रिक्षा चालकांमध्ये संभ्रम पसरत आहे. गॅसचा तुटवडा नाही मात्र दरवाढ झाल्याने रिक्षाचालक त्रस्त झाले आहेत. हे दर कमी करण्यासाठी तसेच मीटरचे दर वाढविण्यासाठी आम्ही प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला निवेदन देणार असल्याची माहिती ऑटोरिक्षा चालक महासंघ अध्यक्ष निसार अहमद खान यांनी दिली.

शहरात एलपीजी गॅसचा तुटवडा झाल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रशासनाकडून याचे खंडन केले जात असून, अशा अफवा न पसरवण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे. मात्र युद्धामुळे गॅस मिळणार नाही या भीतीने शहरवासियांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यातच गॅसवर चालणाऱ्या रिक्षाचालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गॅसची दरवाढ झाली आहे. युद्धाआधी ६२ रुपये किलो दराने मिळणार गॅस आजघडीला ८१ रुपये किलोने मिळत आहे. दरवाढीमुळे आणि मिळणाऱ्या उत्पन्नामध्ये ताळमेळ साधने अशक्य होत असल्याने रिक्षा चालक अडचणीत येत आहेत.

ऑटोरिक्षा चालक महासंघाचे अध्यक्ष निसार अहमद खान यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, युद्धामुळे रिक्षासाठी लागणाऱ्या गॅसची दरवाढ करण्यात आली आहे. युद्धाआधी ४६ रुपये दराने मिळणारा गॅस युद्ध सुरु होताच ६२ रुपयांवर गेला तर यात आणखी वाढ होऊन आज ८१ रुपये किलो दराने गॅस मिळत आहे. मीटरनुसार मिळणारे उत्पन्न आणि गॅससाठी लागणार खर्च यात ताळमेळ बसवण्यात रिक्षाचालकांची कसरत होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट! उद्योजकांची तातडीची बैठक; राज्य सरकारकडे करणार मागणी

भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल यांच्यासह खासगी गॅस कंपन्यांकडे गॅस उपलब्ध आहे तरीही तुटवडा आणि दरवाढीचे कारण न समजण्यासारखे असल्याचे निसार अहमद म्हणाले. शहरात २५ हजारांहून अधिक रिक्षा आहेत. यातील १ हजाराच्या आसपास पेट्रोलवर तर उर्वरित २४ हजारांहून अधिक रिक्षा या एलपीजी आणि सीएनजी गॅसवर चालतात.

प्राधिकरणाला प्रस्ताव…

दरवाढ आणि तुटवडा याबाबत आम्ही 6 आरटीओ याव्याशी बोललो असून आरटीओने आम्हाला प्रस्ताव देण्याचे सुचवले आहे. मात्र मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी आरटीओ आग्रह करत आहे. तरीही आम्ही आरटीओ यांच्याकडे प्रस्ताव देणार आहोत. आरटीओ हा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणकडे सादर करतील प्राधिकरण अध्यक्ष हे सकारात्मक निर्णय घेतील अशी आमची अपेक्षा आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी असतात तर सचिव म्हणून आरटीओ हे असतात.
निसार अहेमद (अध्यक्ष, रिक्षा चालक महासंघ)

मीटरदर प्रस्ताव असा

आज २६ रुपयांनी मीटरदर सुरु होते. त्यानंतर प्रत्येक किलोमीटर साठी १८ रुपये असा आहे. आमच्या मागणीनुसार सुरुवातीला २६ वरून २८ रुपये करा, प्रत्येक किलोमीटरसाठी १८ ऐवजी २० रुपये करावे अशी आमची मागणी असल्याचे निसार अहेमद यांनी सांगितले, मीटर कॅलिब्रेशन करण्याची अट ठेवू नये असेही त्यांनी सांगितले.

Chhatrapati Sambhajinagar: खुलताबाद पंचायत समितीत ‘अजब’ युती; भाजपचा सभापती तर ठाकरे गटाचा उपसभापती

Web Title: Chhatrapati sambhajinagar auto rickshaw gas price hike fare increase proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CNG
  • Price Hike

संबंधित बातम्या

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक
1

टाटा Aeris चा पुन्हा टीझर जारी; 25 सप्टेंबरला होणार लाँच, मिळणार नवा लूक

पेट्रोलमधील Ethanol नंतर आता CNG ची बारी! सरकार CNG-PNG मध्ये काय मिसळणार? जाणून घ्या सर्व माहिती
2

पेट्रोलमधील Ethanol नंतर आता CNG ची बारी! सरकार CNG-PNG मध्ये काय मिसळणार? जाणून घ्या सर्व माहिती

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ
3

सीएनजी पंपावर रिक्षा रांगेत लावण्यावरुन वाद, रिक्षाचालकावर शस्त्राने वार; पुण्यातील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.