छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक संकट!
वाळूज येथील मसिआच्या ‘अनिल विश्वासराव चव्हाण’ सभागृहात आयोजित या बैठकीत उद्योजकांनी आपल्या व्यथा मांडल्या. औद्योगिक उत्पादन प्रक्रिया अखंड सुरू राहण्यासाठी स्थिर इंधन पुरवठा आवश्यक असतो. मात्र, अचानक गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे येथील उद्योगांची परिस्थिती बिकट झाली आहे. या समस्येकडे केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मसिआतर्फे तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांनी दिली.
Iran-Israel War: इराणविरोधी कारवाईत ४८ तासांत अमेरिकेचे निघाले दिवाळे; तब्बल इतक्या कोटींचा खर्च
आखाती देशांमध्ये निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विस्कळीत झालेली इंधन साखळी, यामुळे भारताला इंधन व्यवस्थापनासाठी कठोर पावले उचलावी लागली आहेत. केंद्र सरकारने घरगुती ग्राहकांसाठी इंधन राखीव ठेवल्याने उद्योगांच्या उत्पादनात अडथळे निर्माण झाले आहेत. बैठकीत या जागतिक घडामोडींमुळे स्थानिक उद्योगांवर होणाऱ्या परिणामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत मिळालेल्या माहितीनुसार, गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील काही पावडर कोटिंग युनिट्स आजपासूनच बंद पडली आहेत. एलपीजीसाठी पर्याय म्हणून डिझेल, इलेक्ट्रिक किंवा सीएनजी गॅसचा वापर करण्यावर चर्चा झाली, मात्र अनेक उद्योगांची यंत्रणा पूर्णपणे एलपीजीवर आधारित आहे. अशा परिस्थितीत तातडीने पर्यायी इंधनावर स्थलांतर करणे तांत्रिक आणि आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याचे उद्योजकांनी नमूद केले.
या बैठकीला मसिआचे अध्यक्ष अर्जुन गायकवाड यांच्यासह किरण जगताप, मनीष अग्रवाल, राहुल मोगले, सचिन गायके, सर्जेराव साळुंके, राजेश मानधनी, अजय गांधी, जगदीश जोशी, प्रदीप चौधरी, हरिश पठाडे, श्रीराम शिंदे आणि विविध औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






