Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा! जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेला कडक निर्देश; जलयुक्त शिवार २.० चा आढावा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत. गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत ११९ कामे पूर्ण झाली असून शेतकऱ्यांना सुपीक गाळाचा लाभ मिळाला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 05, 2026 | 02:52 PM
पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा! जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेला कडक निर्देश; जलयुक्त शिवार २.० चा आढावा
Follow Us
Follow Us:

 

  • पावसाळ्यापूर्वी जलसंधारणाची कामे पूर्ण करा!
  • जिल्हाधिकारी यांचे यंत्रणेला कडक निर्देश
  • जलयुक्त शिवार २.० चा आढावा
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर जिल्ह्यात मृद जलसंधारणाची कामे वेळत व पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने समन्वय राखून काम करावीत असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सोमवारी दिले. जलयुक्त शिवार २.० अंतर्गत आज जिल्ह्यातील जलसंधारण कामांचा आढावा घेण्यात आला. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अशा विविध जलसंधारण उपचार उपाययोजना राबविणाऱ्या यंत्रणांचा आढावा घेण्यात आला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., उपवनसंरक्षक सुवर्णा माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, जलसंधारण अधिकारी (जि.प.) कपिल बिडकर, वरिष्ठ भू वैज्ञानिक जीवन बेडवाल तसेच तालुकास्तरावरील अधिकारी दुरदृष्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. सन २०२५-२६ या वर्षात गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत धरणांतील व जलसाठ्यांमधील गाळ काढण्याच्या २०० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ११९ कामे पूर्ण झाली आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

सुमारे २०.९५ लाख घनमीटर गाळ काढून १८७१ शेतकऱ्यांच्या शेतात पसरविण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १३ कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. या योजनेमुळे पाझर तलावांची साठवण क्षमता वाढली असून शेतीला सुपिक गाळाचा मोठा फायदा होत आहे. येत्या पावसाळ्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण करावी. त्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने परस्पर समन्वय राखावा. नाला खोलीकरणाच्या कामांवर भर द्या. येत्या पावसाळ्यात अधिकाधिक जलसंधारण होऊ शकेल यादृष्टीने कामांची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी गौडा यांनी यावेळी दिले.

Smart City Mission Handover: स्मार्ट सिटीचे सर्व प्रकल्प आता महापालिकेच्या ताब्यात; ३० हून अधिक अधिकाऱ्यांकडे सोपवली जबाबदारी

६२ गावांमध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची कामे

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्ह्यात ५० ग्रामपंचायतीत ६२ गावांमध्ये ५२ सुक्ष्म सिंचनासाठी जलोपचार कामे सुरु आहेत. त्यासाठी ४९ कोटी ४ लक्ष रुपयांचा निधी खर्च होणार आहे. २२ हजार २९३ हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

४८ नाल्यांच्या खोलीकरणाचे प्रस्ताव

सन २०२६-२७ साठी ४८ नाल्याच्या खोलीकरणाचे प्रस्ताव तयार असून सुमारे ७.५० लाख घनमीटर गाळ काढण्याचे नियोजन आहे. यासाठी अंदाजे ३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात येत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जिल्ह्यात आराखड्यानुसार २७२८ कामे मंजूर

जिल्ह्यात एकूण ३५२१ कामे मूळ गाव आराखड्यानुसार मंजूर होती, तर सुधारित आराखड्यानुसार २७२८ कामे मंजूर आहेत. मृद व जलसंधारण, कृषी, वन, जिल्हा परिषद आणि भूजल विभाग या विभागामार्फत ही कामे करण्यात येत आहेत. विशेष निधी अंतर्गत १९६९ कामांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी १६८६ कामे पूर्ण झाली आहेत. विभागांच्या अभिसरणाच्या माध्यमातून ६१० कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रलंबित कामांच्या सद्यस्थितीचा विभागनिहाय आढावा यावेळी घेण्यात आला.

Fake Fertilizer Racket: संभाजीनगरमध्ये बनावट खत रॅकेटचा पर्दाफाश; २६ लाखांचा साठा जप्त, नामांकित कंपन्यांच्या नावाखाली फसवणूक

Web Title: Chhatrapati sambhajinagar collector vinay gowda review water conservation work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 02:52 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • water

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.