Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Arrest Fraud : छत्रपती संभाजीनगरमध्ये ६९ वर्षीय निवृत्त कर्मचाऱ्याला ११ लाखांचा गंडा

Digital Arrest Fraud : छत्रपती संभाजीनगरमधील हडको येथील नवजीवन कॉलनीत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी ६९ वर्षीय सेवानिवृत्त महावितरण कर्मचाऱ्याची ११ लाख रुपयांची फसवणूक केली. आधारकार्डचा वापर करून सिमकार्ड खरेदी केल्याचा आणि त्या माध्यमातून अतिरेकी कारवायांसाठी आर्थिक व्यवहार झाल्याचा बनाव आरोपींनी रचला.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 19, 2026 | 10:32 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  •  बँक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा आरोप  
  • वृद्धाला अकरा लाखांला घातला गंडा   
  • दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल  
Digital Arrest Fraud : आधारकार्डचा वापर करून घेतलेल्या सिमकार्डद्वारे अतिरेकी कारवायांसाठी पैशांचे व्यवहार झाल्याचा बनाव रचत एका ६९ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला अटकेची भीती दाखवून डिजिटल अरेस्ट करण्यात आले. खाकी गणवेशातील कथित पोलिस अधिकाऱ्याने व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्यावर पाळत ठेवली. आरबीआयच्या पडताळणीच्या नावाखाली त्यांच्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळण्यात आले. रक्कम आरबीआयकडे जमा झाल्याची बनावट पावतीही दाखवण्यात आली. हा प्रकार २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान हडकोतील नवजीवन कॉलनीत घडला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा आरोप

प्रकरणात ६९ वर्षीय वृद्धाने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हे महावितरणमधून सिनियर ऑपरेटर पदावरून जानेवारी २०१५ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. ते पत्नी व दोन मुल सुना व नातवांसह राहतात. २५ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांना अनोळखी क्रमांकावरून फोन आला. आपण डेटा प्रोटेक्शन अथॉरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे सांगत, त्यांच्या आधारकार्डचा वापर करून नाशिकमधील रेणुकानगर येथे सिमकार्ड खरेदी करण्यात आले असून त्या सिमकार्डच्या आधारे मुंबईतील कॅनरा बँकेत खाते उघडून त्यात कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले असून, हा पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात असल्याचे सांगून त्यांना घाबरवण्यात आले.

काही मिनिटांतच त्यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. खाकी गणवेशातील व्यक्तीने आपण नाशिकच्या पंचवटी पोलिस ठाण्यातील निरीक्षक संदीप राव असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या कथित अधिकाऱ्याने बँक खात्यांमध्ये अवैध पैसा जमा झाल्याचा आरोप करत अटक होऊ शकते, अशी भीती दाखवली.

सासरच्या छळाला कंटाळून हिनाने संपवले जीवन; पतीसह तिघांवर पोलिसांची मोठी कारवाई

वृद्धाला अकरा लाखांला घातला गंडा

अटक टाळायची असल्यास २९ सप्टेंबर रोजी पुन्हा व्हिडिओ कॉल करून रक्कम एकाच खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले. अटकेच्या भीतीने फिर्यादीनी सिडको एन-७ येथील पोस्ट ऑफिसमध्ये १० लाखांची एफडी मोडली. सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या खात्यात रक्कम जमा केल्यानंतर भामट्यांनी दिलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यावर ११ लाख रुपये आस्टीजीएस केले. आठ ते दहा दिवसांत चौकशी पूर्ण झाल्यावर पैसे परत मिळतील, असे सांगून आरबीआयच्या नावाने बनावट पावती दाखवण्यात आली.

दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल

६ ऑक्टोबर रोजी वृत्तपत्रात डिजिटल अरेस्टसंदर्भातील बातमी वाचल्यानंतर आपलीही अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी सिडको पोलिस ठाण्यातून दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास निरीक्षक अतुल येरमे करत आहेत.आरबीआयमार्फत बँक खात्यांची चौकशी करण्यासाठी सहकार्य करावे लागेल, असे सांगण्यात आले. सर्व बँक खाती, एफडी आणि आरडीमधील रक्कम एकाच ठिकाणी जमा करण्यास सांगण्यात आले. भिती पोटी फिर्यादी तयार झाले.

Badlapur Crime News : बदलापुरात जुन्या वादातून एका तरुणाची कुऱ्हाडीने हल्लाकरत हत्या गणेश यादवचा मृत्यू,

 

Web Title: Chhatrapati sambhajinagar digital arrest fraud retired employee 11 lakh sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 10:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • sambhaji nagar news

संबंधित बातम्या

Sambhajinagar Crime News : पतीने पत्नीच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर खाजगी व्हिडिओ पाठवले; छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल
1

Sambhajinagar Crime News : पतीने पत्नीच्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर खाजगी व्हिडिओ पाठवले; छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हा दाखल

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या
2

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक
3

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.