Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

मामेबहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेला वाद जीवघेणा ठरला. गारखेड्यात १९ वर्षीय तौसिफ शेखवर चाकूने हल्ला करून त्याची हत्या करण्यात आली.

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 15, 2026 | 03:31 PM
Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

Crime News: मामेबहिणीशी बोलल्याचा राग अनावर; आधी धमकी, नंतर चाकूने वार करून १९ वर्षीय तरुणाची हत्या

Follow Us
Follow Us:
  • मामेबहिणीशी बोलल्याने वाद
  • चाकूने वार; १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू
  • आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू 

छत्रपती संभाजीनगर : मामेबहिणीशी बोलत असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून १९ वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. गारखेडा परिसरातील साईनगर येथे बुधवारी (१४ ऑक्टोबर) रात्री सुमारे ११ वाजता ही घटना घडली. तौसिफ शमीम शेख (वय १९, रा. साईनगर, गारखेडा) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी आदित्य शेळके याच्याविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

नूर मस्जिदच्या मागे झाला वाद

तौसिफ हा आई-वडिलांसोबत राहत होता. सेंट्रिंगचे काम करून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री सुमारे १० वाजता जेवण झाल्यानंतर तौसिफ आणि त्याचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख हे नूर मस्जिदच्या मागील बाजूस बसले होते. त्यावेळी आदित्य शेळके तेथे आला. आदित्यची मामेबहिण तौसिफशी बोलत असल्याच्या कारणावरून त्याने तौसिफशी वाद घातला. वाद वाढू नये म्हणून मुजम्मील यांनी तौसिफला घरी जाण्यास सांगितले. यावेळी आदित्यने तौसिफला सोडणार नसल्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा: Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

घरासमोर पुन्हा आला अन् हल्ला केला

काही वेळाने मुजम्मील आपल्या घरासमोर आले. त्यावेळी तौसिफ मोटारसायकलवर बसून मोबाईल पाहत होता. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आदित्य पुन्हा तेथे आला. त्याने हातातील चाकूने तौसिफच्या छातीत अचानक वार केला. हल्ल्यामुळे तौसिफ खाली कोसळला. त्यानंतर आदित्यने त्याच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावरही चाकूने वार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

तौसिफवर हल्ला झाल्याचे लक्षात येताच मुजम्मील आणि इतर नागरिक त्याच्याकडे धावले. मात्र, तोपर्यंत आदित्य घटनास्थळावरून पसार झाला होता. गंभीर जखमी झालेल्या तौसिफला नातेवाइकांनी तातडीने मोटारसायकलवरून एमजीएम रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. तौसिफच्या छातीसह नाक आणि डोक्यावरही जखमा झाल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.

हेही वाचा: Chhtrapati sambhajinagar: मुलीवर अत्याचाराचा गुन्हा मिटवण्यासाठी आईनेच मागितले ३९ लाख; २५ हजार घेताना रंगेहात अटक

आरोपीचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. या प्रकरणी तौसिफचा चुलत भाऊ मुजम्मील जमील शेख यांच्या फिर्यादीवरून आदित्य शेळके याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येनंतर फरार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण आणि घटनेमागील इतर बाबींचा तपास पोलिस करत आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्येचे कारण काय सांगितले जात आहे?

    Ans: आरोपीची मामेबहिण तौसिफशी बोलत असल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

  • Que: मृत तरुण कोण?

    Ans: १९ वर्षीय तौसिफ शमीम शेख.

  • Que: आरोपीला अटक झाली का?

    Ans: नाही. आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Web Title: Garkheda 19 year old youth murder knife attack chhatrapati sambhajinagar sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar Crime
  • Crime . Crime News
  • killing news
  • Knife attack
  • Youth Murder

संबंधित बातम्या

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ
1

Kolhapur Crime News: नवरात्र मंडपातच अध्यक्षाने काढले रिव्हॉल्व्हर; गोळीबाराने कोल्हापुरात खळबळ

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा
2

‘मी आणखी किती सहन करू?’ पोस्टनंतर यूट्यूबर बेपत्ता; १.७५ कोटींच्या खंडणीप्रकरणी गुन्हा

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार
3

Crime News: आई-वडील जेवायला गेले अन् सहा वर्षांच्या चिमुरडीसोबत घडला धक्कादायक प्रकार

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…
4

Crime News: नाशिकमध्ये बाल लैंगिक शोषणाचे २५० व्हिडिओ व्हायरल; दीड वर्षांपासून सुरू होता प्रकार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.