
फोटो सौजन्य सोशल मिडिया
राज्य शासनाने संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व ९ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. या अनुषंगाने बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील ५ लाख ९२ हजार २७१ शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करण्यात आला असून त्यास जिल्हास्तरावरुन मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, दिवाळसण तोंडावर असतानाही मदत मिळाली नसल्याची ओरड होत होती. त्यामुळे दिवाळीपूर्वी अग्रीम ५ हजार रुपये खात्यात जमा करण्याची तरतूद शासनाने केली.
त्यानुसार मंगळवारी (३ नोव्हेंबर) जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी हजार रुपये अग्रीम जमा करण्यात आले. दरम्यान, उर्वरित शेतकऱ्यांनाही दोन दिवसांत रक्कम मिळणार. असल्याचे सांगण्यात आले आहे. यात प्राधान्याने अॅग्रीस्टॅक माहितीनुसार पात्र लाभार्थ्यांना मान्यता देण्यात आली. त्यासाठी फार्मर आयडी नुसार डेटा उपलब्ध करुन देण्यात आला. त्यानुसार तपासणी व मान्यता प्रक्रिया पूर्ण करुन ही अग्रीम मदत देण्यात आली.
अग्रिम मदत करण्यात फार्मर आयडी असलेल्या शेतकऱ्यांना या मदतीसाठी प्राधान्य देण्यात आले असून अशा शेतकऱ्यांना अग्रिम मदत जमा करण्यासाठी मान्यता देण्यात आली. जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांचा संबंधित यंत्रणांकडून डेटा उपलब्ध केला. त्यानुसार शेतकऱ्यांची तपासणी आणि मान्यता प्रक्रिया पूर्ण करून ही अग्रीम मदतजमा करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी गौडा म्हणाले.
Sambhajinagar News : जिल्ह्यातील ४ हजार ३३ शाळांचे मूल्यांकन; ८ शाळांना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी
आत्तापर्यंत जिल्ह्यात ११९ कोटी ६६ लक्ष रुपये मदत आहे. उर्वरीत शेतकऱ्यांनाही लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी जिल्हा व तालुका पातळीवरील कार्यालये अहोरात्र, सुटीच्या दिवशीही कामकाज करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत मदत उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटीबद्ध आहेत. असे जी. सी. (जिल्हाधिकारी) विनय गौडा यांनी सांगितले.
तालुका शेतकरी संख्या
छ. संभाजीनगर – १७,०३६
गंगापूर – ३२,८५५
कन्नड- ३८,१९१
खुलताबाद – १०,८०४
पैठण – ३२८०५
फुलंब्री – १५,६५०
सिल्लोड – ३१,८१५
सोयगाव – १४,७२३
वैजापूर- ४५,४४१
एकूण- २,३९,३२०