Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा ‘ई-फाईल’वर भर; प्रलंबित फेरफार प्रकरणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा १ महिन्याचा अल्टिमेटम

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ई-फायलिंग प्रणालीमुळे कामाला वेग येणार आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रलंबित फेरफार प्रकरणांसाठी १ महिन्याचा कालावधी दिला असून वेरूळ विकासासाठी ८०० कोटींचा आराखडा तयार केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 15, 2026 | 03:51 PM
छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा 'ई-फाईल'वर भर

छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा 'ई-फाईल'वर भर

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर प्रशासनाचा ‘ई-फाईल’वर भर
  • प्रलंबित फेरफार प्रकरणांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा १ महिन्याचा अल्टिमेटम
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): एका टेबलावरून दुसऱ्या टेबलावर जाण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी शासनाने ‘ई-फाईल’ प्रणालीला प्राधान्य दिले आहे. छत्रपती संभाजीनगर येथेही ई फायलिंगने गती घेतली आहे. यामुळे आता ‘हातोहात फाईल’ नेण्याची जुनी प्रथा पूर्णपणे बंद होणार आहे. आज घडीला जिल्ह्यात ८० टक्के ई-फायलिंग होत असून ते १०० टक्क्यांपर्यंत घेऊन जाणार असल्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.

सोमवारी ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. जिल्ह्यात १० हजारांहून अधिक फेरफार प्रकरणे प्रलंबित आहेत. यावरून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांची बैठक घेऊन त्यांनी आवश्यक सूचना केल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये १ महिन्याच्या आत ही प्रकरणे निकाली पाहिजेत. महसूल विभागातील दिरंगाई आता खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

काम पूर्ण करण्यासाठी विशेष बैठका घेणार

मतदार यादा पुनानराक्षण कायक्रमात ग्रामाण भागात हे काम समाधानकारक असले तरी शहरात मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल चिंता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. हे काम ‘टाइम बॉण्ड’मध्ये पूर्ण करण्यासाठी विशेष बैठका घेऊन गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. यासोबतच जनगणनेचे काम देखील प्राधान्याने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार! यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; ‘या’ तारखेला हीट वेव्हचा इशारा

स्वतः निरीक्षण करण्याचा निर्णय

कोणतीही फाईल विहित मुदतीत संबंधित टेबलावरून पुढे सरकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. कोणत्या टेबलावर फाईल किती वेळ थांबली आहे, याचे मी स्वतः वैळोवेळी निरीक्षण करणार असून, संबंधितांना थेट जाब विचारला जाईल, असा इशारा प्रशासकीय यंत्रणेला दिला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राधान्यक्रम ठरवून निधी मागू

२०२७ साली नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ, घृष्णेश्वर, पैठण या तीर्थक्षेत्रांवर पर्यटकांची गर्दी होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात विविध सुविधा निर्माण करण्यासाठी ९५० कोटी रुपयांचा प्राथमिक विकास आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये उज्जैन, वाराणसीच्या धर्तीवर वेरूळचा विकास करण्यासाठी ८०० कोटी तर पैठण, आपेगावच्या विकासासाठी सुमारे १५० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र एवढा मोठ्या प्रमाणात निधी मिळणे अशक्य असल्याने प्राधान्यक्रम ठरवून त्यासाठी निधी मागणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जे काम सध्या सुरु आहे, ते मुदतीत पूर्ण करणार असल्याचे ते म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा

Web Title: Chhatrapati sambhajinagar e file system land records development plan 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार! यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; ‘या’ तारखेला हीट वेव्हचा इशारा
1

छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार! यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; ‘या’ तारखेला हीट वेव्हचा इशारा

ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
2

ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा
3

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक
4

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.