Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा

छत्रपती संभाजीनगरमध्ये १ मेपासून नव्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळणार आहे. सुरुवातीला ५ जलकुंभांच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 14, 2026 | 02:51 PM
छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर!
  • १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार
  • ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली असून, महाराष्ट्र दिनापासून केवळ पाच जलकुंभांच्या माध्यमातूनच पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. या जलकुंभांच्या कार्यक्षेत्रातील वसाहतींना नव्या योजनेचे पाणी मिळेल, असा विश्वास आयुक्त अमोल येडगे यांनी व्यक्त केला.

ढोरकीन येथे स्क्रोल व्हॉल्व्ह निखळल्यामुळे काही दिवस पंपिंग थांबवावे लागले होते. दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर सोमवारी जायकवाडी धरणातून पुन्हा पाणी सोडण्यात आले. सुमारे २५०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीतून पाणी प्रवाहित होऊ लागल्याने चाचणी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. यापूर्वी शुक्रवारी पाणी शहराच्या वेशीपर्यंत पोहोचले होते; मात्र तांत्रिक बिघाडामुळे तीन दिवस काम ठप्प झाले होते. आता हा अडथळा दूर झाल्याने पुढील टप्प्यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे.

पत्रकारांशी बोलताना आयुक्तांनी स्पष्ट केले की, नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात वेळेत पाणी पोहोचल्यास १ मेपासून पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो. मात्र, एकाच वेळी वाढीव २०० एमएलडी पाणी संपूर्ण शहरात वितरित करणे शक्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सुरुवातीला मर्यादित क्षेत्रातच पाणीपुरवठा होणार असून, नंतर हळूहळू विस्तार करण्यात येईल.

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक

हायड्रॉलिक चाचणीबाबत संभ्रम अद्याप कायम

मुख्य जलवाहिनीची हायड्रॉलिक चाचणी झाली का, या प्रश्नावर आयुक्तांनी सांगितले की अल्ट्रासॉनिक व रेडिएशन संबंधित चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत, कंत्राटदार कंपनीच्या मते या चाचण्या हायड्रॉलिक चाचणीइतक्याच प्रभावी आहेत. तथापि, याबाबत तांत्रिक स्तरावर चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

पहिल्या टप्यात पाणीपुरवठा होण्याची शक्यता

शहरातील खालील जलकुंभ महापालिकेच्या ताब्यात आले असून, या भागांमध्ये पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहेः शिवाजी ग्राउंड, टीव्ही सेंटर, हिमायत बाग, दिल्लीगेट, प्रतापनगर, हनुमान टेकडी (भूमिगत जलकुंभ) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीकडून हे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. या क्षेत्रांपासूनच नव्या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.

Chhatrapati Sambhajinagar: अग्निशमन दलाला हायटेक बूस्टर! पालकमंत्री संजय शिरसाट यांचा पुढाकार; १५.७८ कोटींची यंत्रणा दाखल

Web Title: Chhatrapati sambhajinagar new water supply scheme starting from may 1

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • water scheme

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.