Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार! यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद; ‘या’ तारखेला हीट वेव्हचा इशारा

Chhatrapati Sambhajinagar Temperature: मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात होत असलेली वाढ मंगळवारी देखील नोंदवण्यात आली. मंगळवार दि. १४ रोजी ४१. ४ अंश सेल्शियस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 15, 2026 | 03:24 PM
छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार!

छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार!

Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरचा पारा ४१ पार!
  • यंदाच्या हंगामातील सर्वोच्च तापमानाची नोंद
  • ‘या’ तारखेला हीट वेव्हचा इशारा
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर शहरात उन्हाचा तडाखा कायम असून दररोज साततयाने वाढ होत आहे. मागील तीन दिवसांपासून कमाल तापमानात होत असलेली वाढ मंगळवारी देखील नोंदवण्यात आली. मंगळवार दि. १४ रोजी ४१. ४ अंश सेल्शियस कमाल तापमानाची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. यंदाच्या हंगामात ही सर्वोच्च तापमान आहे.

मार्च महिन्यापासून वाढलेल्या तापमानाचा जोर एप्रिलच्या सुरुवातीपासून अधिक तीव्र झाला आहे. आता खऱ्या अर्थाने उन्हाचे चटके बसू लागले आहेत. चिकलठाणा वेधशाळेने नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच शहराचे कमाल तापमान चाळीशी पार गेले असून ते थेट ४१.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अचानक वाढलेल्या या उकाड्यामळे नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत तासण्यासार तापमानाचा पारा वेगाने वर जात आहे.

हवेतील आर्द्रता अवघी १२ टक्के असल्याने शहरात कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. परिणामी, दुपारच्या वेळेस उन्हाचे चटके असह्य होत असून रस्त्यांवर अघोषित संचारबंदीसारखे चित्र पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरसाठी खुशखबर! १ मेपासून नव्या योजनेचे पाणी मिळणार; ‘या’ ५ जलकुंभांतून होणार पुरवठा

दरवर्षी मे महिन्यात होणारी तापमानवाढ यंदा एप्रिल मधेच अनुभवायला मिळत आहे. भौगोलिक परिस्थिनुसार शहराच्या विविध भागांतील तापमानात तफावत आढळते. चिकलठाणा वेधशाळेने मंगळवारी कमाल ४१. ४ तर किमान २५. ८ अंश सेल्शियस तापमानाची नोंद केली आहे. गांधेली, एमजीएम परिसरात यात काहीसा दिलासा दिसून येतो. दरम्यान, वाढत्या उन्हामुळे रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसत आहे.

आठवडाभर कडाका राहण्याची शक्यता

पुढील संपूर्ण आठवडाभर शहरात उन्हाचा हा कडाका कायम राहण्याची शक्यता असून यात वाढ होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. अभ्यासकांच्या अंदाजानुसार आगामी आठवड्यात शहराचे कमाल तापमान ४१ ते ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार शनिवारपर्यंत शहराचे तापमान चाळिशीपार राहणार आहे. ते १६ एप्रिल रोजी उष्णतेचाय लाटेचा (हिट वेव्ह) इशारा देण्यात आला आहे.

१४ एप्रिलचे कमाल तापमान असे किमान

४१.४°C
२५.८ °C

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक

Web Title: Chhatrapati sambhajinagar temperature reaches 41 degrees heat wave alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • heat wave
  • Weather

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
1

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम
2

Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला
3

CM कार्यालयातून बोलतोय, पठाणची तक्रार तातडीने नोंदवून घ्या, तोतया व्हीआयपीचा बनाव फसला

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू
4

ऐन पावसाळ्यात मराठवाडा तहानलेलाच! १८२ गावे अन् ११७ वाड्यांना ३०३ टँकरचा आसरा; तर ‘या’ जिल्ह्यातच सर्वाधिक टँकर सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.