Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक

छत्रपती संभाजीनगरमधील प्राथमिक शिक्षकांना उन्हाळ्याच्या सुट्टीत जनगणना आणि निवडणूक कामांचा विळखा. शिक्षक समितीने प्रशासनाकडे प्रशिक्षणाचे वेळापत्रक बदलण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 13, 2026 | 04:34 PM
Chhatrapati Sambhajinagar: उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा! जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक
Follow Us
Follow Us:

 

  • उन्हाळ्याच्या सुट्टीत शिक्षकांना शासकीय कामांचा विळखा!
  • जनगणना आणि प्रशिक्षणावरून शिक्षक समिती आक्रमक
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): संभाजीनगर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांवर मे महिन्यात विविध शासकीय कामांचा वाढता ताण येत असल्याने शिक्षक समितीने शासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. दोन मे ते १४ जून या कालावधीत जनगणना हे राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे काम राबविण्यात येणार असून, त्याचबरोबर निवडणूक आयोगाकडून मतदार याद्यांचे पुनर्रचना व अद्ययावत करण्याचे काम संपूर्ण मे महिन्यात चालणार आहे. याशिवाय दुसरी ते चौथीच्या बदललेल्या अभ्यासक्रमासाठी नवीन प्रशिक्षण सुद्धा याच कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शिक्षकांना १५ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्टया असतात. या सुट्ट्यांमध्ये अनेक शिक्षक आपल्या घालवतात, कुटुंबीयांसोबत वेळ नातेवाईकांना भेट देतात तसेच वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडतात.

जिल्ह्यातील सुमारे ७० टक्क्यांहून अधिक शिक्षक हे बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याने त्यांना वर्षभर आपल्या कुटुंबीयांना भेटण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत सुट्टयांमध्ये जनगणना, मतदार नोंदणी (बीएलओ) आणि प्रशिक्षणाची कामे सोपविणे हा शिक्षकांवरील अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. शिक्षक समितीने सुचविले आहे की, नवीन अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हा प्रशिक्षण संस्थेमार्फत आयोजित करण्यात यावे. जनगणना हे राष्ट्रीय काम असल्याने त्यात शिक्षक सहकार्य करण्यास तयार आहेत, मात्र मतदार नोंदणी व इतर प्रशासकीय कामांना मे महिन्यात स्थगिती देण्यात यावी. अन्यथा शिक्षकांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन त्यांच्या अध्यापन कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

AI ठरतोय Game Changer? TCS मध्ये नोकऱ्यांचा पॅटर्न बदलला! 24000 कर्मचारी कमी केले, 25000 फ्रेशर्सना दिली ऑफर

विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शिक्षकांचा मानसिक संतुलन व उत्साह महत्त्वाचा आहे. त्यामुळे या जनगणनेच्या कामासंदर्भात राज्य शासनाने शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर, रणजीत राठोड, नितीन नवले, श्याम राजपूत खंडोबा साळवे, दिलीप रासनी आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कामास तयार मात्र, सुट्यांत नको

जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती विजय साळकर यांनी म्हटले आहे की, जनगणना सारख्या राष्ट्रीय कामात शिक्षक पूर्ण सहकार्य देतील मात्र, सुट्टयांमध्ये इतर प्रशासकीय कामांचा बोजा टाकणे योग्य नाही. शिक्षकांची मानसिकता चांगली राहणे आवश्यक आहे. शासनाने प्रशिक्षण व इतर कामांचे वेळापत्रक पुनर्विचार करून शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावे.

CBSE 10th Result 2026: पहिल्यांदाच एप्रिलमध्ये लागणार CBSE 10-12 वी निकाल! Digilocker वरून करा डाऊनलोड

Web Title: Sambhajinagar primary teachers protest census and training during summer vacation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Career News
  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई
1

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी
3

Agniveer Government Jobs: अग्निवीरांसाठी गुड न्यूज! सरकारी नोकरीचे दरवाजे खुले; पोलीस, अग्निशमन, वन विभागात संधी

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
4

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.