Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

७५ वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पैठणच्या संत एकनाथ महाराज मंदिरात दिलेली भेट हा इतिहासातील सुवर्णक्षण आहे. वाचा या ऐतिहासिक भेटीमागचा समतावादी उद्देश.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 14, 2026 | 03:13 PM
ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते

ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते

Follow Us
Follow Us:

 

  • ऐतिहासिक सुवर्णक्षण!
  • जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते
  • ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा
मुक्तार शेख । नवराष्ट्र पैठण: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ७५ वर्षांपूर्वी संत एकनाथ महाराज मंदिरास भेट ही पैठणच्या इतिहासातील एक अविस्मरणीय घटना तर आहेच, पण पैठणच्या इतिहासातील तो एक सुवर्णक्षणच आहे. संत एकनाथांच्या समाधीचे दर्शन घ्यावे, ही बाबासाहेबांनी एकनाथांच्या समतावादी कार्याला दिलेली एक प्रकारची मानवंदनाच आहे आणि बाबासाहेब तेवढे द्रष्टेही होतेच. डॉ. आंबेडकरांबद्दल काय सांगावे? त्यांच्या ज्ञानाबद्दल काय लिहावे? त्यांच्या मानवोद्धाराबद्दलच्या कार्याचे गुणगान करावे, तरी कसे? बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे अनेक प्रसंगांतून तावूनसुलाखून निघालेले होते.
Dr. Ambedkar paid visit to the tomb (Samadhi) of Saint Eknath at Paithan,1949 pic.twitter.com/Pu4rbAvQBm — Congress (@INCIndia) April 14, 2016


बाबासाहेबांच्या बुद्धीचे तेज अवघ्या विश्वात आजही व्यापून राहिलेले आहे. आपल्या जीवनाचा नेमका उद्देश, आपल्या कार्याची नेमकी दिशा या साऱ्यांचे भान बाबासाहेबांना होते; बुद्धिप्रामाण्यवाद त्यांच्या ठायीठायी वसलेला होता. म्हणूनच पैठणला बाबासाहेब भाबड्‌या श्रद्धेपोटी आलेले नव्हते, तर ज्या समतेच्या मार्गावर त्या काळी बाबासाहेब क्रांती करत जात होते, त्याच मार्गावरून साडेतीनशे वर्षे आधीच चालणाऱ्या एका देवमाणसाप्रती असणाऱ्या आपलेपणाच्या, कृतज्ञतेच्या भावनेतूनच बाबासाहेब पैठणला नाथांच्या दर्शनाला आले होते. एका महामानवाने दुसऱ्या महामानवाचा केलेला हा सन्मानच होता.

DR. Babasaheb Ambedkar : शहरात जाण्यासाठी पैसै चोरणारा भिवा ते अर्थतज्ज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर; महामानवाच्या संघर्षमय गाथा

यांची होती उपस्थिती

साधारणतः हा काळ होता १९४९ च्या आसपासचा. औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाचे काम सुरू झाले होते. त्या निमित्ताने बाबासाहेबांच्या शहरात चकरा होत होत्या. सुरुवातीच्या काळातच पैठणला जाण्याची इच्छा प्रकट केली. बाबासाहेबांनी एकनाथांच्या समाधी मंदिरास भेट दिली, त्या वेळेस त्यांच्या सोबत कर्मवीर दादासाहेब गायकवाड, कमलाकांत चित्रे, डॉ. राजभोग व इतर कार्यकर्ते होते.

बाबासाहेबांची भेट ठरली क्रांतिकारी घटना

संत एकनाथांच्या समाधी मंदिराचे दर्शन घेण्यासाठी बाबासाहेब मुद्दामहून पैठणला आले, ही एक क्रांतिकारी घटनाच आहे. आपल्या प्रचंड व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून बाबासाहेब पैठणला येतात, ही अपूर्व घटना आहे. पैठणला येण्याचा बाबासाहेबांचा दुहेरी उद्देश असावा. एक तर, संत एकनाथांच्या मानवतावादी कार्याला मानवंदना द्यावी व या पुण्य महात्म्याच्या कर्मभूमीचे दर्शनही घ्यावे. दुर्दैवाने या भेटीविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्या वेळेस गावातील काही कार्यकर्त्यांशी किंवा काही प्रतिष्ठित लोकांशी बाबासाहेबांची भेट झाली होती का? ते लोक कोण होते, त्यांच्यात काय वार्तालाप झाला असेल किंवा समाधी मंदिरात त्यांच्या सोबत असणाऱ्या व जमलेल्या कार्यकर्त्यांना बाबासाहेबांनी काय मार्गदर्शन केले असेल? त्या सगळ्या बाबी आज काळाच्या पडद्याआड गेलेल्या आहेत.

राज्यघटनेतून समतेचा दीप प्रज्वलित करणारे Dr. Babasaheb Ambedkar यांची जयंती; जाणून घ्या 14 एप्रिलचा इतिहास

Web Title: Dr babasaheb ambedkar historic visit to paithan 75 years anniversary

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • dr babasaheb amdekar
  • Paithan

संबंधित बातम्या

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त
1

Food license suspended : बजरंग ट्रेडिंग कंपनीचा परवाना निलंबित, FDA ने छत्रपती संभाजीनगरमध्ये ₹ 23.35 लाख किमतीचे खाद्यतेल जप्त

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक
2

Sambhajinagar Crime News : दारू प्यायला पैसे न दिल्याने मेडिकल दुकानदाराच्या पोटात चाकू खुपसला; काही तासांत तिघांना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.