Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSMC Election 2026: संभाजीनगरात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार! भाजप नेत्याच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत

Chhatrapati Sambhajinagar Election 2026: ईव्हीएम मशीन बंद पडण्याच्या घटनानंतर आता मतदार यांद्यामध्ये मोठा घोळ पाहायला मिळत आहे. भाजप नेत्याला त्यांच्या स्वर्गवासी वडीलांचे नाव मतदार आढळले आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 15, 2026 | 12:23 PM
CSMC Election 2026: संभाजीनगरात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार! भाजप नेत्याच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत

CSMC Election 2026: संभाजीनगरात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार! भाजप नेत्याच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत

Follow Us
Close
Follow Us:
  • अतुल सावे यांच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत
  • निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित
  • छत्रपती संभाजीनगरात मोठा गोंधळ
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानादरम्यान निवडणूक आयोगाचा भोंगाळ कारभार समोर आला आहे. मतदान सुरु झाल्यानंतर काही वेळातच संभाजीनगरात ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. मशीन बराच काळ सुरु न झाल्याने मतदार निराश झाले होते. त्यानंतर बराच काळ मशीन सुरु झाले नव्हते. ईव्हीएम मशीननंतर आता संभाजीनगरात आणखी एक मोठा गोंधळ समोर आला आहे. या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं पाहायला मिळालं. भाजप नेते अतुल सावे यांचे वडील व दोन वेळा खासदार राहिलेले मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्ये निधन झाले. मात्र त्यानंतरही मोरेश्वर सावे यांचे नाव मतदार यादीत पाहायला मिळाले. या सर्व प्रकरणामुळे निवडणूक आयोगाच्या भोंगाळ कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

NMC Election 2026: नागपुरात राजकीय वातावरण तापलं! काँग्रेस उमेदवाराचं कार्यालय जाळलं, भाजपकडे संशयाची सुई

भाजप नेत्याच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत

अतुल सावे यांच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत आढळल्याने आता अनेक शंका निर्माण होत आहेत. तसेच आयोगाच्या कामावर प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणावरून पुन्हा राजकारण तापणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजप नेते अतुल सावे यांचे वडील व माजी शिवसेना नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्ये निधन झाले. तरी देखील अद्याप त्यांचे नाव मतदार यादीत असल्याचे पाहायला मिळत आहे. मोरेश्वर सावे यांच्या निधनाला तब्बल 10 वर्ष उलटल्यानंतरही त्यांचे नाव मतदार यादीत कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या प्रकरणी तपास करण्याची विनंती आता केली जात आहे. या प्रकरणामुळे आता निवडणूक आयोगाच्या कामकाजावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.  (फोटो सौजन्य – YouTube)

गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर गोंधळ

छत्रपती संभाजी नगर येथील गुजराती कन्या विद्यालयातील मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. मतदान सुरु असतानाच ईव्हीएम मशीन बंद पडले, त्यामुळे तासभर मतदारांना रांगेत थांबावे लागले होते. 1 तास मशीन सुरु न झाल्याने मतदारांना बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. एकीकडे भाजप नेत्याच्या स्वर्गवासी वडिलांचे नाव मतदार यादीत आढळले तर दुसरीकडे सुमारे तासभर ईव्हीएम मशीन बंद होते. त्यामुळे संभाजीनगरात मतदानादरम्यान निवडणूक आयोगाच्या नियोजनावर शंका उपस्थित केली जात आहे.

BMC Election 2026: अभिनेता अक्षय कुमारपासून माजी राज्यपाल राम नाईक… आतापर्यंत या दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यभरात गोंधळ

आज राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. मात्र मतदानावेळी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. कधी मतदार यादीतून नाव गायब होत आहे तर कधी ईव्हीएम मशीन बंद होते. ही परिस्थिती कोणत्याही एका शहरात नाही. तर छत्रपती संभाजीनगर, मुंबई, पुणे, सोलापूर, पिंपरी चिंचवडसह अनेक ठिकाणी मतदार वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत आहेत.

Web Title: Chhatrapati sambhajinagar election 2026 bjp leader atul save found deceased father name in voting list

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 12:23 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections

संबंधित बातम्या

KMC Elections 2026: एक स्टेटस पडलं महागात! प्रचाराची वेळ संपली तरी देखील सोशल मीडियावर प्रचार सुरुच; 66 उमेदवारांना नोटीस
1

KMC Elections 2026: एक स्टेटस पडलं महागात! प्रचाराची वेळ संपली तरी देखील सोशल मीडियावर प्रचार सुरुच; 66 उमेदवारांना नोटीस

PMC Election 2026 : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?
2

PMC Election 2026 : मतदानाऐवजी पुणेकरांची सिंहगडावर गर्दी; लोकशाहीपेक्षा विरंगुळ्याला पसंती?

Chandrakant Patil : ‘पैज लावून सांगतो, मुंबईत भाजपला 90 जागा मिळतील’, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा सांगितली भविष्यवाणी
3

Chandrakant Patil : ‘पैज लावून सांगतो, मुंबईत भाजपला 90 जागा मिळतील’, चंद्रकांत पाटलांनी पुन्हा सांगितली भविष्यवाणी

PMC Election 2026: एकच नाव, दोन यादीत! दुहेरी मतदान टाळण्यासाठी…; पुण्यातला नेमका घोळ काय?
4

PMC Election 2026: एकच नाव, दोन यादीत! दुहेरी मतदान टाळण्यासाठी…; पुण्यातला नेमका घोळ काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.