Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात ८ मिनिटांत १ टन कचरा उचलणाऱ्या 'जटायू' मशीनचे प्रात्यक्षिक! महापौर समीर राजूरकर यांच्या उपस्थितीत चिकलठाणा एमआयडीसीत चाचणी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 10, 2026 | 05:17 PM
Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
Follow Us
Follow Us:
  • ८ मिनिटांत १ टन कचरा गायब!
  • छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक
  • महापौरांची उपस्थिती
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगर शहरातील बंद करण्यात आलेल्या कचरा डेपोंच्या जागा स्वच्छ करून त्यांचे सुशोभीकरण केले जात असतानाच, काही नागरिकांकडून रात्री, पहाटे किंवा सकाळच्या वेळी पुन्हा कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे. अशा ठिकाणी साचलेला कचरा पारंपरिक पद्धतीने उचलण्यासाठी मनुष्यबळ, वाहने आणि मोठा वेळ लागतो. या पार्श्वभूमीवर अवघ्या आठ ते दहा मिनिटांत ट्रॅक्टरभर कचरा उचलण्याचे प्रात्यक्षिक चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घेण्यात आले.

जटायू नावाच्या या मशीनद्वारे सुमारे एक टन कचरा उचलता येत असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला. संबंधित कंपनीने महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमोर या मशीनचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी महापौर समीर राजूरकर, नगरसेवक मनोज गांगवे, राजगौरव वानखेडे आदी उपस्थित होते.


महापौर राजूरकर यांनी सांगितले की, ‘जटायू’ मशीन कोणत्याही प्रकारच्या वाहनावर बसविता येते. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची गरज भासणार नाही. शहरातील विविध तथा ठिकाणी अनधिकृतपणे टाकला जाणारा कचरा कमी वेळेत हटविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो.

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

दरम्यान, विभागीय आयुक्त सीएसएमआरडीएचे जी. श्रीकांत यांनी महानगर प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कचरा संकलनासाठी अशा मशीनचा वापर करता येईल का, याची चाचपणी केली होती. पुणे जिल्ह्यातील काही नगरपालिकांमध्ये अशा मशीनचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित कंपनीशी संपर्क साधून संभाजीनगरात प्रात्यक्षिकासाठी बोलावण्यात आले.

मशीनच्या कार्यक्षमतेची पाहणी करण्यासाठी महापौरांसह नगरसेवक व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सुमारे पाच ते दहा किलो वजनाच्या वस्तूही मशीन सहज उचलत असल्याचे प्रात्यक्षिकातून दिसून आले. कमी वेळेत कचरा हटविण्याच्या दृष्टीने हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते, असे नगरसेवक मनोज गांगवे यांनी सांगितले. मात्र, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सुविधा या मशीनमध्ये नसल्याने दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र उचलला जातो.

सुका कचरा वेगळा न करता एकत्र उचलला जाणार

‘जटायू’ मशीनच्या प्रात्यक्षिकात आठ ते दहा मिनिटांत एक ट्रॅक्टरभर कचरा उचलता येत असल्याचे दाखविण्यात आले. मशीनची कचरा उचलण्याची क्षमता सुमारे एक टन असल्याचा कंपनीचा दावा आहे. पाच ते दहा किलो वजनाच्या वस्तूही मशीन सहज उचलू शकते. ओला आणि सुका कचरा वेगळा न करता एकत्र उचलला जाणे ही मात्र या यंत्राची प्रमुख मर्यादा आहे.

Ambadas Danve: नवीन इमारतीला फर्निचर हवेच, सतरंज्यांवर…? जिल्हा परिषद फर्निचर वादावर अंबादास दानवेंचे रोखठोक वक्तव्य

Web Title: Chhatrapati sambhajinagar jatayu garbage machine demonstration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 05:17 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • MIDC

संबंधित बातम्या

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
1

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र
2

Sambhajinagar News : मनाची धावपळ थांबवा, हृदयाची धडधड वाचवा! तज्ज्ञांनी सांगितला हृदय जपण्याचा कानमंत्र

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर
3

मुखपाठ फाट्याजवळ भीषण अपघात! बसची ट्रेलरला धडक, पुढचा भाग चक्काचूर; जखमींचा आकडाही समोर

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?
4

Ulhas River : उल्हास नदीचा रंग पुन्हा बदलला; रसायने की मातीचा भराव?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.