Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार! पालकमंत्र्यांच्या हस्ते आधुनिक कचरा संकलन व्यवस्थेचा शुभारंभ

छत्रपती संभाजीनगर शहरात नवीन घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ. ड्रेनेज साफसफाईसाठी एन्डोबोट वापरणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 03, 2026 | 03:29 PM
छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगर स्वच्छतेत देशात अव्वल होणार!
  • पालकमंत्र्यांच्या हस्ते आधुनिक कचरा संकलन व्यवस्थेचा शुभारंभ
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी दिले. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरात नवीन घनकचरा संकलन व वाहतूक व्यवस्थेचा शुभारंभ करून आधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. आयोध्यानगरी येथे आयोजित या कार्यक्रमात घनकचरा हस्तांतरण केंद्रांचेही उद्घाटन सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले, शहराच्या स्वच्छतेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. पुढील काळात ड्रेनेज साफसफाईसाठी अत्याधुनिक एन्डोबोट उपलब्ध करून दिला जाणार असून, यामुळे कामगारांना ड्रेनेजमध्ये उतरावे लागणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमात मंत्री अतुल सावे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत समाधान व्यक्त केले. संभाजीनगरची ओळख राष्ट्रीयच नव्हे तर जागतिक स्तरावर निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेचा मोठी कारवाई; १५ वर्षांपासूनची अवैध ‘शहानुरमिया दर्गा चौपाटी’ भुईसपाट

महापौर समीर राजूरकर यांनी पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन हे शहरातील दोन महत्त्वाचे विषय असल्याचे सांगितले. सिंगल यूज प्लास्टिकविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत तब्बल ९० लाखांचा प्लास्टिक साठा जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाला गती मिळाल्याचे सांगत, प्रणालीमुळे स्वच्छतेला मोठी मदत होईल, असे जी. श्रीकांत यांनी सांगितले.

अत्याधुनिक यंत्रणेला दिले प्राधान्य

शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी कॅप्सूल वाहनांसह नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू करण्यात आला आहे. यामुळे कचरा संकलनाची गती वाढणार असून स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे. कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन ड्रेनेज साफसफाईसाठी ‘एन्डोबोट’ ही यंत्रणा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातूनच कचरा वर्गीकरण करणे गरजेचे आहे. ओला व सुका कचरा वेगळा केल्यास संपूर्ण व्यवस्थापन अधिक परिणामकारक ठरणार आहे.

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणावर तिहेरी ताण! बाष्पीभवनामुळे दररोज कोट्यवधी लिटर पाणी हवेत; मराठवाड्यावर पाणीसंकटाचे सावट

Web Title: Chhatrapati sambhajinagar modern waste management system endobot launch news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • MAL Sanjay Shirsat

संबंधित बातम्या

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार
1

Census 2026 Maharashtra: शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनो सावधान! जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा केल्यास थेट गुन्हे दाखल होणार

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी
2

छत्रपती संभाजीनगरकरांची तहान भागणार! नव्या योजनेतून जॅकवेलचे पंपिंग सुरू; १२ जूनपर्यंत शहराला मिळणार अतिरिक्त पाणी

पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश
3

पावसाळ्यात वीज गुल होणार नाही! महावितरणचा ‘ॲक्शन प्लॅन’ तयार; ३० मे पर्यंत मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश

“मातृत्व हा गुन्हा नाही!”; गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल
4

“मातृत्व हा गुन्हा नाही!”; गरोदरपणाच्या कारणावरून नोकरी नाकारणे बेकायदेशीर; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.