Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार, कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी!

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात प्रधानमंत्री आवास योजनेच्या सोडतीनंतर गृहकर्जाचा पेच! १० वर्षांनंतर घर मिळाले पण वयाची ५० शी ओलांडल्याने बँकांकडून कर्ज मिळण्यात अडथळे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 10, 2026 | 04:34 PM
Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार (Photo Credit- X)

Chhatrapati Sambhajinagar: दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • दहा वर्षांपूर्वी अर्ज करणाऱ्यांपैकी अनेकजण आता पन्नाशीपार
  • कर्जाच्या कचाट्यात सापडले घरकुल लाभार्थी !
  • वाचा सविस्तर बातमी!
छत्रपती संभाजीनगर: दहा वर्षांपूर्वी घराचे स्वप्न उराशी बाळगून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज केले. आता ऑनलाइन सोडतीत घर मिळाल्याने आशा पल्लवित झाल्या; मात्र प्रत्यक्ष ताब्यापूर्वीच कर्जाचा पेच निर्माण झाला आहे. अर्जावेळी असलेले वय आता वाढले असून अनेक लाभार्थी पन्नाशीपार झाले आहेत. त्यामुळे बँकेकडून गृहकर्ज मंजूर होईल का, याची चिंता त्यांना सतावत आहे.

महापालिकेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि बेघर नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरात ११ हजार १२८ घरांचा प्रकल्प राबविला आहे. घराच्या किमतीपैकी १० टक्के रक्कम लाभार्थ्यांना स्वतः उभारावी लागणार असून उर्वरित रक्कम कर्जातून भागविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे सोडतीनंतर कर्जमंजुरीचा टप्पा महत्त्वाचा ठरला आहे.

दशकभरापूर्वी अर्ज केलेल्यांपैकी अनेकांचे वय आता पन्नाशीच्या पुढे गेले आहे. परिणामी कर्जाची मुदत, मासिक हप्ता आणि उर्वरित सेवाकाळ यांचा मेळ बसविणे आव्हानात्मक ठरू शकते. मर्यादित उत्पन्न असलेल्या लाभार्थ्यांना दीर्घ मुदतीचे कर्ज मिळण्याबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

महापालिकेच्या योजनेत पात्र ठरणे आणि बँकेकडून गृहकर्ज मिळणे या स्वतंत्र प्रक्रिया आहेत. बँका कर्जदाराचे उत्पन्न, सिबिल गुणांकन, विद्यमान कर्जे, वय, तारण, हमीदार आणि परतफेडीची क्षमता तपासतात. आवश्यक कर्जरक्कम मंजूर न झाल्यास उर्वरित रक्कम स्वतः उभारण्याची क्षमता नसलेल्या कुटुंबांसमोर घराचा ताबा घेण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

अंमलबजावणीची प्रतीक्षा

कर्जप्रक्रियेत अडचणी येऊ नयेत यासाठी महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी २२ जूनच्या बैठकीत संबंधित विकासकांना बँकांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले होते. लाभार्थी आणि बैंक अधिकाऱ्यांचा संपर्क घडवून आणणे, कागदपत्रांसाठी मदत करणे तसेच कॉल सेंटर व व्हॉट्सअॅप गट तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

३,६३८ लाभार्थ्यांनी दर्शवली स्वीकृती

पहिल्या टप्प्यात ११,१२८ घरांपैकी ३६३८ घरांसाठी लाभार्थ्यांनी स्वीकृती दर्शविली आहे. उर्वरित ७४८२ घरांसाठी इच्छुक लाभार्थ्यांची प्रतीक्षा आहे. ऑनलाइन सोडतीतील लाभार्थ्यांची यादी विकासकांना दिल्यानंतर कर्जप्रक्रियेला वेग येईल.

कर्जासाठी तपासणी कशाची ?

कर्ज अर्जाच्या छाननीत सिबिल गुणांकन, विद्यमान कर्जे, उत्पन्न, परतफेडीची क्षमता, तारण आणि वय यांचा विचार केला जातो. दशकभरात लाभार्थ्यांच्या कौटुंबिक व आर्थिक परिस्थितीत बदल झाला आहे. जुन्या अर्जाच्या आधारावर आजची कर्जक्षमता ठरविणे आव्हानात्मक ठरू शकते. महापालिका, विकासक आणि बँकांनी समन्वयाने एकच मदत केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी लाभार्थ्यांची अपेक्षा आहे.

Abhijeet Dipke: ‘आम्ही ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून…’; सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली पुढील रणनीती; म्हणाले…

Web Title: Chhatrapati sambhajinagar pmay home loan issue after lottery marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:34 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Home loan
  • Pradhan Mantri Awas Yojana

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती
1

Chhatrapati Sambhajinagar: ८ मिनिटांत १ टन कचरा गायब! छत्रपती संभाजीनगरात ‘जटायू’ मशीनचे यशस्वी प्रात्यक्षिक; महापौरांची उपस्थिती

RBI On Home Loans : होम लोन घेणाऱ्यांना होणार मोठा फायदा? रिझर्व्ह बँकेने बदलले नियम, बँकांना काय दिलेत निर्देश?
2

RBI On Home Loans : होम लोन घेणाऱ्यांना होणार मोठा फायदा? रिझर्व्ह बँकेने बदलले नियम, बँकांना काय दिलेत निर्देश?

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
3

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Sambhajinagar  CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!
4

Sambhajinagar CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.