Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी जलवाहिनीला मोठी गळती; १० तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत

छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी 10 तासांचा शटडाऊन घेण्यात आला आहे. जाणून घ्या कोणत्या भागात पाणीपुरवठा विस्कळीत होणार आणि प्रशासनाने काय पर्यायी व्यवस्था केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 08, 2026 | 03:29 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी! जायकवाडी जलवाहिनीला मोठी गळती; १० तासांचा शटडाऊन, ‘या’ भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत
Follow Us
Follow Us:

 

  • छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीबाणी!
  • जायकवाडी जलवाहिनीला मोठी गळती; १० तासांचा शटडाऊन
  • ‘या’ भागांचा पाणीपुरवठा विस्कळीत
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा मानल्या जाणाऱ्या जायकवाडी उद्भव येथील मुख्य जलवाहिनीला गंभीर गळती लागल्याने महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. यासाठी शुक्रवारी (८ मे) सकाळी ९ वाजल्यापासून सुमारे १० तासांचा शटडाऊन घेण्यात येणार असून, पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी आणखी ६ तासांचा कालावधी अपेक्षित आहे.

जायकवाडीतील विहीर परिसरातील स्मशानभूमीजवळील १२१९ मिमी व्यासाच्या पोलादी जलवाहिनीवर ही गळती निर्माण झाली आहे. मागील काही जलवाहिनी फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. संभाव्य मोठे नुकसान टाळण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा तातडीने दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. शटडाऊन दरम्यान १०० एमएलडी क्षमतेच्या मुख्य वाहिनीमधील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील. त्यामुळे शहरातील काही भागांत कमी दाबाने किंवा उशिरा पाणी मिळण्याची शक्यता आहे.

कमी परिणाम जाणवेल

दुरुस्तीच्या कालावधीत नागरिकांना गैरसोय कमी व्हावी यासाठी जुन्या ७०० मिमी तसेच नव्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सिडको हडको परिसर, एक्सप्रेस वाहिनीवर अवलंबून असलेल्या भागांमध्ये तुलनेने कमी परिणाम जाणवेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

Fuel Shortage: संभाजीनगरमध्ये इंधन संकट! पेट्रोल-डिझेलसाठी रांगा, तर गॅस सिलिंडरसाठी १२ दिवसांचे वेटिंग; प्रशासनाचा दावा फोल?

पर्यायी व्यवस्थेतून पाणीपुरवठा सुरू

शटडाऊनच्या काळात जुन्या ७०० मिमी व नव्या ९०० मिमी व्यासाच्या जलवाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे सिडको हडको तसेच एक्सप्रेस वाहिनीवर अवलंबून असलेल्या भागांना तुलनेने कमी परिणाम जाणवेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

होय, पाणी जपून वापरा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना आवश्यक तेवढेच पाणी वापरण्याचे, तसेच आधीच पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून शक्य तितक्या लवकर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

लवकर काम पूर्ण करू

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने छञपती संभाजीनगर शहरातील नागरिकांना पाणी साठवून ठेवण्याचे व आवश्यकतेनुसार काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. त्यातच जायकवाडी येथील दुरुस्तीचे काम शक्य तितक्या लवकर पूर्ण करून पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही प्रशासनाने सांगितले.

Fuel Shortage: संभाजीनगरमध्ये इंधन संकट! पेट्रोल-डिझेलसाठी रांगा, तर गॅस सिलिंडरसाठी १२ दिवसांचे वेटिंग; प्रशासनाचा दावा फोल?

Web Title: Chhatrapati sambhajinagar water supply shutdown jayakwadi pipeline repair 8 may

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Crisis

संबंधित बातम्या

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा
1

संभाजीनगरकरांसाठी आनंदाची बातमी! १५ दिवसांत नव्या दोन्ही जलवाहिन्या होणार सुरू; पाणीटंचाईतून मिळणार कायमचा दिलासा

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!
2

Chhatrapati Sambhajinagar: मनपा भरती की विद्यार्थ्यांची फसवणूक? वेगवेगळ्या अर्जांना एकच प्रश्नपत्रिका; उमेदवारांचा संतप्त सवाल!

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
3

‘माझं लेकरू परत आलं हो…’, छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
4

संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.