Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News: जलसंधारणाला मिळणार बळ; जिल्हा प्रशासन ‘डब्ल्यूओटीआर’मध्ये सामंजस्य करार

Washim Water Conservation: वाशिम जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून जलसुरक्षा, कृषी उत्पादकता आणि ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) सोबत सामंजस्य करार केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 04, 2026 | 06:32 PM
Washim Water Conservation

Washim Water Conservation

Follow Us
Follow Us:
  • वाशिम जिल्ह्यात जलक्रांतीची तयारी
  • ५३५ गावांमध्ये राबविणार जलसंवर्धन उपक्रम
  • वाशिम प्रशासनाचा WOTR सोबत सामंजस्य करार
वाशिम: जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करून जलसुरक्षा, कृषी उत्पादकता आणि ग्रामीण कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. विदर्भ जलसंवर्धन उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (डब्ल्यूओटीआर) यांच्यात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला.

या करारावर जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, डब्ल्यू ओटीआरच्यावतीने संस्थेचे कार्यकारी संचालक प्रकाश केसकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरेंद्र वाघमारे, प्रादेशिक व्यवस्थापक शरद भनगडे, प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण वरकर व विजय बनसोडे, तसेच एचडीएफसी बँकेचे समूह प्रमुख राजकुमार पोजगे आणि जिल्हा व्यवस्थापक राम शर्मा यांची उपस्थिती होती.

Buldhana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना ६७.३६ कोटींची भेट, मिळणार दुहेरी आर्थिक दिलासा; केंद्रीय राज्यमंत्री जाधवांची माहिती

विदर्भ जल संवर्धन उपक्रमाचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचे पुनरुज्जीवन, शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी बळकट करून ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे हा आहे. विदर्भातील ७ जिल्ह्यांमधील ९ तालुक्यांतील ५३५ गावांमध्ये हा कार्यक्रम राबविण्याचे नियोजन आहे. यामध्ये ३५० गावांमध्ये शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून, तर १८५ गावांमध्ये एचडीएफसी परिवर्तनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून विशेष उपाययोजना करण्यात येणार आहेत.

जलसंधारण, भूजल पुनर्भरण आणि शेतीला प्राधान्य या कार्यक्रमांतर्गत डोंगरमाथ्यापासून ते दरीपर्यंत एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकासाची कामे करण्यात येणार आहेत. पावसाचे पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे, जलसाठा संरचनांचे बळकटीकरण आणि जमिनीची पाणीधारण क्षमता वाढविणे यावर भर राहणार आहे. शेतकऱ्यांना प्रात्यक्षिके, प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाच्या माध्यमातून सुधारित कृषी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे.

विविध विभागांच्या समन्वयातून अंमलबजावणी

  • जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांमधील समन्वय, प्रशासकीय सहकार्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मदत करण्यात येईल.
  • तर डब्ल्यूओटीआर संस्थेकडून ग्रामस्तरावर लोकसहभाग वाढविणे, जनजागृती, प्रशिक्षण, क्षमता बांधणी, सुक्ष्म नियोजन आणि ग्रामस्तरीय संस्थांचे सक्षमीकरण यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे.
  • कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी त्रैमासिक किंवा सहामाही बैठका घेण्यात येणार आहेत. सामंजस्य कराराचा कालावधी तीन वर्षांसाठी आहे.

मालेगाव तालुक्यातील २० गावांची निवड

जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात या कार्यक्रमांतर्गत एचडीएफसी परिवर्तनच्या सहकार्याने २० गावांची निवड करण्यात आली आहे. या गावांमधील ६ हजार ८२८ कुटुंबांतील ३१ हजार २९१ नागरिकांना या णार प्रकल्पाचा लाभ अपेक्षित आहे.

Buldhana News : पावसाने वाळणारी पिकं आता वाचणार? तूर, कपाशी आणि हळदीला सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय!

Web Title: Washim water conservation wotr agreement 535 villages vidarbha project pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 06:32 PM

Topics:  

  • Washim
  • Washim news
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरमधील 432 विहिरी बेपत्ता! प्रशासकीय आकडेवारीतून खुलासा; बिल्डरांच्या हितावर गंभीर सवाल
1

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरमधील 432 विहिरी बेपत्ता! प्रशासकीय आकडेवारीतून खुलासा; बिल्डरांच्या हितावर गंभीर सवाल

Washim Ganja Farming Case: ७० वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात सुरू होता अवैध धंदा; पोलिसांनी टाकली धाड आणि…
2

Washim Ganja Farming Case: ७० वर्षीय शेतकऱ्याच्या शेतात सुरू होता अवैध धंदा; पोलिसांनी टाकली धाड आणि…

Washim Murder Case News: “आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब…” सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!
3

Washim Murder Case News: “आई रक्ताच्या थारोळ्यात अन् वडील गायब…” सकाळी मुलीने दरवाजा उघडताच उघडकीस आला भयानक प्रकार!

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर
4

Nagpur News : नागपूरकरांना दिलासा; तूर्तास पाणी कपात नाही; पाण्याची बचत आणि गळती रोखण्यावर मनपाचा भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.