Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड, जिल्हा परिषदेचा अखेर ‘कोरम’ पूर्ण !

छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत सहा वर्षांनंतर पहिली सर्वसाधारण सभा पार पडली. नाट्यमय घडामोडींनंतर १० विषय समित्यांच्या ८३ सदस्यांची बिनविरोध निवड झाली असून आता विकासकामांना गती मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 16, 2026 | 03:32 PM
Chhatrapati Sambhajinagar: १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड

Chhatrapati Sambhajinagar: १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड

Follow Us
Follow Us:
  • १० विषय समित्यांसाठी ८३ सदस्यांची बिनविरोध निवड
  • जिल्हा परिषदेचा अखेर ‘कोरम’ पूर्ण !
छत्रपती संभाजीनगर, (शहर प्रतिनिधी): तब्बल सहा ते सात वर्षांनी मिनी मंत्रालयात सदस्यांचा आवाज घुमला. बुधवारी पहिली सर्वसाधारण सभा आणि विषय समिती सदस्य निवड सभा घेण्यात आली. प्रचंड गदारोळ आणि मानापमान नाट्यात ही सभा पार पडली. यात १० विषय समित्यांची ८३ सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच सभापतींना खातेवाटप करण्यात आले. यानुसार आज जिल्हा परिषदेतील कोरम पूर्ण झाला असून आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

जिल्हा परिषदेची पहिली सर्वसाधारण सभा आणि विषय समिती सदस्य निवड सभा बुधवारी मराठवाडा महसूल शिक्षण प्रबोधिनी सभागृहात पार पडली. सभेला, अध्यक्ष अविनाश गलांडे, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल यांच्यासह सर्व सदस्य तसेच प्रशासनाकडून अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

विषय समिती सदस्यांची निवड ही बिनविरोध व्हावी असा प्रयत्न भाजपचा होता. मात्र अनेक सदस्यांनी एकापेक्षा अधिक अर्ज भरल्याने पेच निर्माण झाला. त्यातच काहीजण विशिष्ट समितीसाठी असून बसल्यानेही त्यांची मनधरणी करण्यात पदाधिकाऱ्यांना घाम गाळावा लागला. सूत्रांच्या माहितीनुसार, दुपारी २ वाजता सुरु झालेली सभा सायंकाळी सातपर्यंत सुरु होती. अखेरीस काही सदस्यांना अर्ज मागे घेण्यासाठी राजी करण्यात भाजपला यश आले.

Heat Wave: छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा पारा ४१.४ अंशांवर! प्रशासनाकडून ‘हीट वेव्ह’चा इशारा; आरोग्य यंत्रणा ‘अलर्ट’ मोडवर

अडीच तास विलंब

स्थायी, अर्थ व बांधकाम, कृषी, शिक्षण, आरोग्य, जल व्यवस्थापन व पाणीपुरवठा, पशुसंवर्धन व दुग्धविकास तसेच समाजकल्याण अशा प्रमुख समित्यांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करणे, स्वीकृती आणि माघारीची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजेच १०० हुन अधिक अर्ज दाखल झाल्याने निवड प्रक्रिया गुंतागुंतीची ठरली. सत्ताधारी भाजपने शिवसेना (शिंदे गट), ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यासोबत पूर्वनियोजन करून जागावाटपाचा फॉर्म्युला तयार केला होता. या सूत्रानुसार सर्व समित्या बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. परंतु अनेक सदस्यांनी आपल्या पसंतीच्या समित्यांवर आग्रह धरत बदलाची मागणी केल्याने समीकरणे बिघडली. परिणामी, निवड प्रक्रियेला तब्बल अडीच ते तीन तास विलंब झाला.

उबाठातील अंतर्गत मतभेदांमुळे गुंता

ठाकरे गटातील अंतर्गत मतभेदामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली. कृष्णा डोणगावकर यांची जलसंधारण समितीसाठी शिफारस करण्यात आली होती, तर मनोज गायके यांना स्थायी समितीसाठी प्राधान्य देण्यात आले होते. मात्र, ऐनवेळी डोणगावकर यांनी स्थायी समितीत स्थान मिळावे, अशी भूमिका घेतली. त्याचवेळी गायके यांना जलसंधारण समितीत समाविष्ट करण्याची मागणी पुढे आल्याने तणाव उफाळून आला. अनेक बैठका, चर्चासत्रे आणि तडजोडीच्या माध्यमातून अखेर सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढण्यात आला.

Sanjay Shirsat : “महापालिकेच्या इमारतीत भुताटकी, इथे आत्मे वावरतात”, संजय शिरसाट यांचा दावा, आता नवा वाद सुरु होणार?

Web Title: Chhatrapati sambhajinagar zp subject committee selection member list 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 03:32 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
1

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा
2

Uddhav Thackeray Sambhajinagar Visit: मराठवाड्यात राजकीय धुरळा; ठाकरे पिता-पुत्रांचे सलग दौरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.