Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ZP School Condition: जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, पालकांमध्ये भीतीचे सावट

ZP School News: अजिंठा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाली असून छताचे प्लास्टर कोसळत आहे. जि. प. सदस्य सय्यद नासेर हुसेन यांनी पाहणी करत सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 02:15 PM
जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले

जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी! पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले

Follow Us
Follow Us:
  • जिवंत मरणाच्या दाढेत विद्यार्थी!
  • पावसामुळे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले
  • पालकांमध्ये भीतीचे सावट
Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण झाल्याने तिची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. छतावरील प्लास्टर मोठ्या प्रमाणात कोसळत असून, विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसामुळे शाळेतील अनेक वर्गखोल्यांमध्ये ठिकठिकाणी गळती सुरू असल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. जि. प. शाळेच्या या गंभीर परिस्थितीची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य सय्यद नासेर हुसेन यांनी शाळेला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत शेख मन्नान, दिलीप झलवार, मंगेश सनान्से तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक ठिकाणी छताला तडे गेल्याचे तसेच…

पाहणीदरम्यान वर्गखोल्यांच्या छतावरील प्लास्टर निखळल्याचे, अनेक ठिकाणी छताला तडे गेल्याचे तसेच पावसाचे पाणी थेट वर्गखोल्यांमध्ये झिरपत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शाळेची तातडीने तांत्रिक पाहणी करण्याची तसेच दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर हाती घेण्याच्या सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

NEET Paper Leak Reaction: ‘नीट’वरून काँग्रेस रस्त्यावर, तर राहुल गांधीविरुद्ध भाजप आक्रमक; संभाजीनगरमध्ये फुल हायव्होल्टेज ड्रामा

पालक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पावसाळ्यामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीचा थेट परिणाम अध्यापनावर होत आहे. गळतीमुळे काही वर्गातील विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी बसवावे लागत असून, नियमित अध्यापनातही अडथळे निर्माण होत असल्याची माहिती मुख्याध्यापक प्रभाकर सोन्ने यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळेची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली. जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने शाळेची पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारत मंजूर करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी जोरदार मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना करून विद्यार्थ्यांना सुरक्षित, दर्जेदार आणि भीतीमुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या आहेत ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या

  • छतावरील सैल झालेले प्लास्टर तातडीने काढून नव्याने प्लास्टर करावे.
  • पावसाची गळती थांबविण्यासाठी संपूर्ण छताचे जलरोधक काम तातडीने करावे.
  • धोकादायक वर्गखोल्यांची तांत्रिक तपासणी करून संरचनात्मक सुरक्षिततेचा अहवाल सादर करावा.
  • आवश्यक असल्यास धोकादायक वर्गखोल्यांतील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था करावी.
  • विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत दुरुस्तीसाठी आवश्यक निधी तातडीने मंजूर करून काम त्वरित सुरू करावे.
Chhatrapati Sambhajinagar: रस्त्यावर कचरा टाकलात तर थेट गुन्हा! सीसीटीव्हीतून शोध घेणार; मनपाच्या २९ पथकांची विशेष मोहीम

Web Title: Dilapidated ajanta zp school building plaster falls syed naser hussain demands urgent repair marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • ZP School

संबंधित बातम्या

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या
1

Maratha Reservation latest News: मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी; संभाजीनगरममध्ये ५,११३ कुणबी नोंदी सापडल्या

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश
2

Chhatrapati Sambhajinagar Asian Hospital Fire: छत्रपती संभाजीनगरमध्ये रुग्णालयाच्या PICU ला आग; ९ नवजात बालकांना वाचवण्यात यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.