
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांचे आदेश; तृतीयपंथीयांच्या तक्रारी सोडवा आणि तातडीने ओळखपत्रे द्या! (Photo Credit- X)
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर विभागातील समाजकल्याण विभागांतर्गत तृतीयपंथी तक्रार निवारण समिती, जादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समिती व दक्षता समितीच्या जिल्हास्तरावरील बैठका नियमित घेण्यात याव्यात व जिल्हास्तरावरील समितीकडे प्राप्त तक्रार प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी येथे दिले.
विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली समाजकल्याण विभागांतर्गत तृतीयपंथी तक्रार निवारण समिती, जादूटोणा विरोधी कायदा व दक्षता समितीची आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. यावेळी नागरी हक्क संरक्षण संभाजीनगर परिक्षेत्राच्या डॉ. अनिता जामदार (भापोसे), छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. दीपक खरात, लातूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, विभागीय तृतीयपंथी समितीचे शेख सीमा नायर हे बैठकीस प्रत्यक्ष उपस्थित होते तर विभागातील समाज कल्याण जिल्हास्तरीय समितीचे सदस्य तथा प्रशासकीय अधिकारी दूरदृश्य प्रणालीव्दारे उपस्थित होते.
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यातील पीडितांचे मदत व पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव जिल्हा दक्षता समितीमार्फत शासनास पाठवावेत. तसेच कागदपत्रांअभावी प्रलंबित असणाऱ्या प्रकरणांची कागदपत्रे तत्काळ जमा करण्याच्या सूचना पापळकर यांनी दिल्या. त्याचबरोबर जिल्ह्यांत घडलेल्या गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात संबंधित जिल्हाधिकारी यांनी भेटी द्याव्यात व प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त पापळकर यांनी दिले.
जिल्ह्यांनी तृतीयपंथीयांचे हक्क व अधिकार यांचे संरक्षणाच्या अनुषंगाने तृतीयपंथीयांना नॅशनल पोर्टल फॉर ट्रांसजेंडर (टीजी) पोर्टलवरून तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र उपलब्ध करून द्यावेत. दरम्यान, जादूटोणा विरोधी अधिनियम 2013 अंतर्गत जादूटोणा, अंधश्रद्धा इतर अमानुष कृत्यांना आळा घालण्याच्या दृष्टीनेही जिल्हा स्तरावर नियमित बैठका घेऊन प्राप्त प्रकरणांवर वेळेत कारवाई करण्याच्या सुचना यावेळी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या.
महिला विनयभंग प्रकरणी खासदार निलेश लंके यांच्या बंधूला हजर राहण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश