Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Water Supply Issue: बोंबला! २७४० कोटींच्या नव्या जलवाहिनीलाही तडा; मुख्य पाईपलाईनची वेल्डिंग निखळली; गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

पाणीपुरवठा सुरू होण्याआधीच उघडकीस आलेल्या या त्रुटीमुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडाली असून, चाचणी प्रक्रिया तात्पुरती थांबली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी किमान दोन दिवसांचा विलंब अटळ मानला जात आहे

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 29, 2026 | 03:06 PM
२७४० कोटींच्या नव्या जलवाहिनीलाही तडा

२७४० कोटींच्या नव्या जलवाहिनीलाही तडा

Follow Us
Follow Us:

 

  • बोंबला! २७४० कोटींच्या नव्या जलवाहिनीलाही तडा
  • मुख्य पाईपलाईनची वेल्डिंग निखळली
  • गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
छत्रपती संभाजीनगर शहराच्या भविष्यासाठी ‘लाईफलाईन’ ठरणार म्हणून गाजवाजा करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेची हवा चाचणीदरम्यानच निघाली आहे. कारकीन परिसरात मुख्य पाइपलाइनची वेल्डिंग निखळल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाल्याने कोट्यवधींच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पाणीपुरवठा सुरू होण्याआधीच उघडकीस आलेल्या या त्रुटीमुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची झोप उडाली असून, चाचणी प्रक्रिया तात्पुरती थांबली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी किमान दोन दिवसांचा विलंब अटळ मानला जात आहे.

वर्षानुवर्षे रखडलेला आणि उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली पूर्णत्वाकडे गेलेला हा प्रकल्प ‘आता काही दिवसांत पाणी नळात’ या आश्वासनांसह पुढे आणला जात होता. मात्र, प्रत्यक्ष चाचणीतच मुख्य पाइपलाइनने दगा दिल्याने संपूर्ण यंत्रणेला धक्का बसला आहे. नवीन योजनेच्या पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेलमधून मुख्य पाइपलाइनमध्ये पाणी सोडून प्रत्यक्ष चाचणी सुरू करण्यात आली होती. २३ मार्च रोजी रात्री पंप सुरू करून सुरुवातीला सुमारे ९०० मीटर अंतरापर्यंत पाणी नेण्यात आले. त्यानंतर पुढील दिवशी साडेतीन किलोमीटरपर्यंत जलवाहिनीची चाचणी यशस्वी झाली.

तिसऱ्या दिवशी दहा किलोमीटरपर्यंत पाणी पोहोचले आणि मधल्या टप्प्यांमध्ये आढळलेल्या किरकोळ गळती दुरुस्त करण्यात आल्या. चौथ्या दिवशी कारकीनपर्यंत सुमारे १३.८० किलोमीटर अंतर पार केल्यानंतर मात्र मुख्य पाइपलाइनच्या वेल्डिंगमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले. पाइपलाइनमध्ये पाणी भरलेले असल्याने तात्काळ काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे संपूर्ण लाईन रिकामी करूनच दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करावी लागली.

२७४० कोटी रुपयांच्या कामावर संशय

शहरासाठी सुमारे २७४० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेली ही महत्वाकांक्षी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीकडून राबवली जात आहे. योजना अंतिम टप्प्यात असताना अशा प्रकारचा बिघाड उघड झाल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील ५० वर्षांसाठी ही योजना महत्त्वाची मानली जात असल्याने सुरुवातीलाच अशा त्रुटी समोर येणे चिंताजनक मानले जात आहे.

जॅकवेल, पंपिंग आणि प्रत्यक्ष पुरवठ्याची तयारी

या योजनेअंतर्गत जॅकवेलचे काम पूर्ण झाले असून त्यावर ३७०० अश्वशक्तीचे दोन उच्च क्षमतेचे पंप बसविण्यात आले आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातून सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात आले. दोन दिवस साठवलेल्या पाण्याची तपासणी करून त्यानंतर मुख्य पाइपलाइनमध्ये सोडण्यात आले. ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर प्रत्यक्ष पुरवठ्याकडे वाटचाल सुरू झाली होती; मात्र त्याच वेळी हा बिघाड समोर आला.

Chhatrapati Sambhajinagar Crime: रस्त्यावरून उचललं, निर्जन शेतात नेऊन गुप्तांगावर वार, तरुण जीवाशी देतोय झुंज

पाईपलाईनच्या चाचणी पद्धतीवर संशयाची गडद छाया

मुख्य पाईपलाईनची पारंपरिक हायड्रॉलिक चाचणी करण्याऐवजी अल्ट्रासाऊंड तंत्राचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे प्रत्यक्ष दबावाखाली पाइपलाइनची ताकद कितपत तपासली गेली, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. काही ठिकाणी पाइपलाइनवर सिमेंटचा थर देण्यात आल्यामुळे दोष लपले गेले असावेत, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. आता संबंधित भागातील सिमेट काढून नव्याने वेल्डिंग केले जात आहे.

ही चाचणी निर्णायक

सध्या दुरुस्तीचे काम सुरू असून संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भविष्यातील मोठ्या पाणीपुरवठ्यावर या योजनेचा थेट परिणाम होणार असल्याने प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण आणि पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे. शहरवासीयांच्या अपेक्षा लक्षात घेता ही चाचणी निर्णायक ठरणार आहे.

घाईचा परिणाम?; प्रशासकीय दबाव

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर योजना सुरू करण्यासाठी घाई करण्यात आल्याची चर्चा आहे. उ‌द्घाटनाची घाई आणि वेळेचा दबाव यामुळे तांत्रिक तपासणीत काही बाबी दुर्लक्षित राहिल्या का, असा सवाल उपस्थित केला जात आहे, अशा त्रुटी समोर येणे प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

दोन दिवस राहिल आता चाचणी ठप्प

कारकीनपर्यंत पाणी पोहोचले असले तरी पुढील चाचणी पूर्णपणे थांबली आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत पाणी पुन्हा पाईपलाईनमध्ये सोडता येणार नाही. दोन दिवस चाचणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रविवारी दुपारपर्यंत दुरुस्ती पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी पुन्हा पूर्ण चाचणी करावी लागणार आहे.

Land Fraud News: बनावट मुखत्यारपत्राआधारे शेतीची विक्री! उपनिबंधकांची फसवणूक; १५.३० लाखांच्या व्यवहारात बोगस कागदपत्रे

Web Title: Even the new 2740 crore water pipeline suffers damage main pipelines welding gives way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Water Issue

संबंधित बातम्या

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!
1

छ. संभाजीनगर जिल्ह्यातील १.८० लाख शेतकऱ्यांची १६३२ कोटींची कर्जमाफी; ‘या’ ७१२ शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग प्रलंबित!

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या
2

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी! शेतात लोंबकळणाऱ्या वीजतारेच्या धक्क्याने महिला मजुराचा जागीच मृत्यू; संतप्त नातेवाईकांचा ठिय्या

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना
3

Chhatrapati Sambhajinagar Crime: दोन वर्षांचा राग, ऑनलाइन मागवला चाकू अन् शिक्षकावर वार; शाळेत रक्तरंजित घटना

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य
4

Chhatrapati Sambhajinagar Crime: संपर्क तोडल्याचा राग, प्रियकराने केला धक्कादायक प्रकार; बीबी-का-मकबऱ्याच्या आडोशात कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.