काय घडलं नेमकं?
सीताराम आसाराम आळंजकर असे जखमी तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्यासुमारास शिंदेवाडी फाट्याजवळील एका शाळेजवळ सीताराम उभे असतांना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना जबरदस्तीने पकडले. त्यांनतर रस्त्यालगतच्या एका निर्जन शेतात नेऊन त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्यांच्या गुप्तांगावर वार करत गंभीर जखमा केल्या. या प्रकरणानंतर आरोपींनी जखमी अवस्थेतच सीताराम यांना पुन्हा रस्त्यावर आणून सोडले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
धक्कादायक! “हत्येसाठी कोणते शस्त्र चांगले, हातोडा की चाकू?” 18 वर्षीय मुलाने AI ला विचारले अन् मग…
या घटनेनंतर सीताराम बराच वेळ घटनास्थळी विव्हळत पडून होते. त्यांच्या अवस्थेची माहिती मिळताच त्यांचे चुलत भाऊ लक्ष्मण आळंजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी सीताराम यांना तातडीने गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
पोलीस तपास सुरु
हल्ला कोणी केला, हल्लयमधील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा नोंदविण्यात आलेला नव्हता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या क्रूर हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Nagpur Crime: शेवटचा व्हिडिओ कॉल…आणि आत्महत्या! नागपुरात नर्सिंग विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल






