Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष; पाच तालुक्यांत पाणीटंचाई, जिल्ह्याच्या सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सरासरी भूजल पातळी १.०४ मीटरने वाढली आहे. पैठण तालुक्यात सर्वाधिक २.७३ मीटरने वाढ झाली असली, तरी सिल्लोड आणि सोयगावसह ५ तालुक्यांत पाणीपातळी कमालीची खालावली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 16, 2026 | 03:09 PM
Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष; पाच तालुक्यांत पाणीटंचाई, जिल्ह्याच्या सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ
Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांचे पावसाकडे लक्ष
  • पाच तालुक्यांत पाणीटंचाई
  • जिल्ह्याच्या सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ
छत्रपती संभाजीनगर (शहर प्रतिनिधी): मान्सूनच्या आगमनाला अद्याप आठवडाभराचा अवकाश आहे. तत्पूर्वी जिल्ह्याची सरासरी पाणीपातळीत १.०४ मीटरने वाढ झाल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मान्सूनपूर्व भूजल पातळीच्या नोंदी समोर घेण्यात आलेल्या आल्या आहेत. या नोंदीनुसार जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतील पाणीपातळीत कमालीचे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

काही तालुक्यांमध्ये पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली असली, तरी काही तालुक्यांमध्ये मात्र पाणीपातळी कमालीची खालावल्याचे चित्र आहे. संपूर्ण जिल्ह्याचा विचार करता भूजल पातळीत सरासरी १.०४ मीटरने वाढ नोंदवली गेली आहे. मागील वर्षी पावसाने चांगलीच हजेरी दिली होती. धरण, नदी नाले, प्राणी प्रकल्पांमध्ये तुडुंब पाणीसाठा जमा झाला होता. पाणीपातळीत याचा परिणाम दिसून आला.

दरम्यान, यावर्षीच्या नोंदीनुसार पैठण तालुक्याला सर्वाधिक दिलासा मिळाला असून, येथील पाणीपातळीत तब्बल २.७३ मीटरने मोठी वाढ झाली आहे. त्याखालोखाल गंगापूर तालुक्यात १.७३ मीटर आणि वैजापूर तालुक्यात १.५१ मीटर पाणीपातळी वाढली आहे. जिल्हा मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगर भागात मात्र ०.०५ मीटर अशी किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. एकीकडे काही तालुक्यांत पाणीपातळी सुधारली असताना दुसरीकडे सिल्लोड, सोयगावसह ५ तालुक्यांत पाणीपातळीत घट झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.

Ayushman Card: मनपाची मोठी कामगिरी! शहरात ५.२६ लाखांपेक्षा जास्त ‘आयुष्मान भारत’ कार्डांची निर्मिती, ५ लाखांचे विमा संरक्षण!

‘पाण्याचा वापर जपून करा’

सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ०.९९ मीटरने पाणीपातळी खालावली आहे. यासोबतच सोयगाव तालुक्यात ०.९८ मीटर, खुलताबाद तालुक्यात ०.८२ मीटर, कन्नड तालुक्यात ०.६२ मीटर आणि फुलंब्री तालुक्यात ०.२९ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी १.०४ मीटरने वाढली असली, तरी सिल्लोड, सोयगाव आणि खुलताबाद या भागांतील घट पाहता मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात या भागात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी १.०४ मीटरने वाढली असली, तरी तालुकानिहाय चढ-उतार खालीलप्रमाणे स्पष्ट दिसून येतात:

पाणीपातळीत वाढ झालेले ४ तालुके वाढ (मीटरमध्ये) पाणीपातळीत घट झालेले ५ तालुके घट (मीटरमध्ये)
पैठण + २.७३ सिल्लोड – ०.९९
गंगापूर + १.७३ सोयगाव – ०.९८
वैजापूर + १.५१ खुलताबाद – ०.८२
छत्रपती संभाजीनगर + ०.०५ कन्नड – ०.६२
— — फुलंब्री – ०.२९

छ. संभाजीनगरकरांची पाणी कोंडी फुटणार! मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण; नव्या योजनेतून पाणीपुरवठा सुरू होण्याची चिन्हे

Web Title: Farmers await rain water scarcity in five talukas while the districts average water level has risen by 104 meters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • farmer
  • Water Crisis
  • Water Issue

संबंधित बातम्या

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील
1

आदरणीय पी डी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवले – बाळासाहेब पाटील

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
2

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.