Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar Protest: दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले; एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने

सोनम वांगचुक आणि नीट पेपरफुटी प्रकरणाच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरात एकाच दिवशी ५ तीव्र आंदोलने झाली. क्रांती चौक आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात एल्गार पुकारला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 21, 2026 | 06:26 PM
दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले

दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद! छत्रपती संभाजीनगर पेटले

Follow Us
Follow Us:
  • दिल्लीतील लाठीमाराचे पडसाद!
  • छत्रपती संभाजीनगर पेटले
  • एकाच दिवशी ५ ठिकाणी तीव्र आंदोलने
Chhatrapati Sambhajinagar: दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेले विद्यार्थी आंदोलन आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांच्या उपोषणाचे पडसाद आता छत्रपती संभाजीनगरात उमटू लागले आहेत. नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ सोमवारी शहरात एकाच दिवशी तब्बल ५ विविध ठिकाणी तीव्र आंदोलने करण्यात आली. केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाचा निषेध नोंदवत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी एकमुखी मागणी या आंदोलनांमधून करण्यात आली.

क्रांती चौकात विद्यार्थ्यांचा एल्गार; सोनम वांगचुक यांच्या अटकेचा निषेध

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला २१ दिवस पूर्ण झाल्यानंतर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ क्रांती चौकात शेकडो विद्यार्थी आणि पालक रस्त्यावर उतरले. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुण, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांवरील अमानुष हल्ल्याचे पडसाद! वंचित बहुजन आघाडीचा ‘या’ दिवशी महाराष्ट्र बंद’ची हाक, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

राष्ट्रवादी (शरद पवार गट), आझाद समाज पार्टी अन् युवासेना आक्रमक

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद चंद्र पवार), आझाद समाज पार्टी आणि युवासेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. “वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे देशातील करोडो तरुणांचे भवितव्य टांगणीला लागले आहे,” असा आरोप नेत्यांनी केला. या आंदोलनात पांडुरंग तांगडे, माजी आमदार संजय वाघचौरे, ख्वाजा शरफोद्दीन, प्रा. सलीम शेख, विश्वजीत चव्हाण, आशिष पवार, सुशील बोर्डे, ऋतुजा खिल्लारे, ललिता मगरे, ईश्वर आडसूल, कल्पना कांबळे, अनुराधा सोनपसारे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

राष्ट्रपतींकडे निवेदनाद्वारे मागणी

शहरातील गांधी पुतळ्याजवळ डाव्या आघाडीतील परिवर्तनवादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. नीट परीक्षेतील गैरप्रकारांची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी पदमुक्त व्हावे आणि भविष्यात पेपर फुटणार नाहीत अशी पारदर्शक यंत्रणा उभारावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी अंकुशराव कदम, निरंजन टकले, खासदार कल्याण काळे, साथी अमर हबीब, साथी सुभाष लोमटे, प्रा. राम बाहेती, साथी रंजन दाणी, किरण पाटील डोणगावकर, प्रा. जयदेव डोळे, अ‍ॅड. विष्णू ढोबळे, प्रा. मंगल खिंवसरा, प्रा. एच. एम. देसरडा, प्रा. सुभाष महेर, कॉ. भीमराव बनसोड, अ‍ॅड. वैशाली डोळस, अ‍ॅड. अभय टाकसाळ, देविदास किर्तीशाही व कॉ. मधुकर खिल्लारे आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यानंतर विभागीय आयुक्तांमार्फत राष्ट्रपतींना तातडीने हस्तक्षेप करण्याचे निवेदन सादर करण्यात आले.

राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात! पीएम हाऊसबाहेर आंदोलनादरम्यान राडा; जंतर-मंतरवर शरद पवारांची एन्ट्री

Web Title: Five major protests in sambhajinagar in support of sonam wangchuk and students marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 06:26 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • CJP
  • CJP Protest
  • Dharmendra Pradhan
  • Sonam Wangchuk

संबंधित बातम्या

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल
1

‘विद्यार्थ्यांना अराजकवादी म्हणण्याची हिंमत कशी झाली?’; वर्षा गायकवाडांचा फडणवीसांवर हल्लाबोल

Vijeta Dahiya: तो ‘व्हायरल व्हिडिओ’ नडला! कॉकरोच जनता पार्टीची मोठी कारवाई; विजेता दहिया यांची सर्व पदांवरून हकालपट्टी
2

Vijeta Dahiya: तो ‘व्हायरल व्हिडिओ’ नडला! कॉकरोच जनता पार्टीची मोठी कारवाई; विजेता दहिया यांची सर्व पदांवरून हकालपट्टी

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!
3

Jitendra Singh: ‘चर्चेची अट मान्य केली, तरीही मागण्या बदलल्या’; राहुल गांधींच्या ‘त्या’ विधानावर केंद्रीय मंत्री भडकले!

Hindustani Bhau : लाठीचार्जच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानी भाऊने सरकारला केली विनंती! “विद्यार्थ्यांवर हात उचलू….”
4

Hindustani Bhau : लाठीचार्जच्या मुद्द्यावरून हिंदुस्थानी भाऊने सरकारला केली विनंती! “विद्यार्थ्यांवर हात उचलू….”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.