
Ghati College Seat Increase ( घाटी महाविद्यालयातील जागांमध्ये वाढ)
या निर्णयामुळे घाटीच्या शैक्षणिक विस्ताराला चालना मिळण्यासोबतच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. घाटीमध्ये सध्या एमडी आणि एमएस अभ्यासक्रमाच्या २०० जागा आहेत. विशेष म्हणजे, यंदा या सर्व जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत.
यावरून पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी घाटीला मिळणारा प्रतिसाद स्पष्ट होतो. वाढती मागणी आणि विद्यार्थ्यांची पसंती लक्षात घेऊन प्रशासनाने जागावाढीचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मिळालेली मंजुरी ही संस्थेच्या शैक्षणिक विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.
एमबीबीएसनंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी नीट पीजी परीक्षेत मोठी स्पर्धा असते. मर्यादित जागांमुळे अनेक विद्यार्थ्यांना पसंतीच्या शाखेत प्रवेश मिळत नाही, अशा वेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जागा वाढल्याने विद्याथ्यर्थ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, या वाढीचा लाभ केवळ एका-दोन शाखांपुरता मर्यादित नसून मूलभूत वैद्यकीय विज्ञानापासून बालरोग आणि नेत्ररोग यांसारख्या शाखांपर्यंत पोहोचणार आहे.
दहा विभागांत अशी वाढ
शरीरस्चनाशास्त्र ९, शरीरक्रियाशास्त्र १८, जैवरसायनशास्त्र १५, औषधनिर्माणशास्त्र ६, सुक्ष्मजीवशास्त्र २, न्यायवैद्यकशास्त्र (एफएमटी) २, समुदाय वैद्यकशास्त्र (पीएसएम) १०, मानसोपचारशास्त्र २. नेत्ररोगशास्त्र ४ आणि बालरोगशास्त्र ५ अशा एकूण ७३ जागांना मंजुरी मिळाली आहे.
एमबीबीएस जागाही वाढविणार
घाटीमध्ये एमबीबीएसच्या आणखी ५० जागा वाढविण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये या जागा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी व्यक्त केली.
डीएमच्या १२ जागांची प्रतीक्षा
डीएम अर्थात डॉक्टर ऑफ मसिन क अतिविशेषोपचार अभ्यासक्रमाच्चया १२ जागा एसएसबीमध्ये मंजूर होण्याची अपेक्षा आहे.
धक्कादायक ! जप्त केलेला तब्बल 900 किलो खवा गायब; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Ans: पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ७३ अतिरिक्त जागांना एनएमसीने मंजुरी दिली आहे.
Ans: २१ क्लिनिकल आणि ५२ नॉन-क्लिनिकल जागांचा समावेश
Ans: सध्या एमडी आणि एमएस अभ्यासक्रमाच्या एकूण २०० जागा उपलब्ध