Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rabi season water schedule 2026 : शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ! रब्बीला दोन, उन्हाळ्यात एक आवर्तन

Rabi season water schedule 2026 : छत्रपती संभाजीनगर येथील नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात एक, अशी तीन पाणी आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले.शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजेनुसार एक टीएमसीपेक्षा अधिक पाणी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 03, 2026 | 03:06 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • आवर्तन सुमारे दोन टीएमसीपर्यंत वाढविण्याची मागणी   
  • पुढील हंगामातील गरजांचा फेरआढावा घेण्यात येईल   
  • रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० नोव्हेंबरला 
Rabi season water schedule 2026 :  छत्रपती संभाजीनगर येथील नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात दोन आणि उन्हाळी हंगामात एक, अशी तीन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्या आवर्तनात प्रत्यक्ष गरजेनुसार वाढीव पाणी उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच जानेवारीमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याचा फेरआढावा घेऊन अतिरिक्त आवर्तनाबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिली. विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नांदूर मधमेश्वर प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.

आवर्तन सुमारे दोन टीएमसीपर्यंत वाढविण्याची मागणी

बैठकीला खा. संदिपान भुमरे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ. विठ्ठलराव लंघे पाटील, आ. प्रतापसिंह पाटील, आ. अंबादास दानवे, झेडपी अध्यक्ष अविनाश गलांडे, तसेच विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., झेडपी सीईओ मिन्नू पी. एम., गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र धोडपकर यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पहिल्या आवर्तनासाठी प्रस्तावित एक टीएमसी पाणी अपुरे पडू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचनाची गरज लक्षात घेऊन हे आवर्तन सुमारे दोन टीएमसीपर्यंत वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली.

त्यावर डॉ. विखे पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत प्रत्यक्ष आवश्यकता आणि उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन वाढीव पाणी देण्याचे नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

बाळापूर तालुक्यात पाणीप्रश्न बिकट; तलावांनी गाठला तळ, नळाला पाणी येत नसल्याने…

पुढील हंगामातील गरजांचा फेरआढावा घेण्यात येईल

पहिल्या आवर्तनानंतर जानेवारीमध्ये उपलब्ध पाणीसाठा, प्रत्यक्ष सिंचनासाठी झालेला वापर आणि पुढील हंगामातील गरजांचा फेरआढावा घेण्यात येईल. त्यानुसार अतिरिक्त पाणी किंवा आणखी एक आवर्तन देण्याबाबत निर्णय घेता येईल, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
पिण्याच्या पाण्याच्या गरजेला बाधा न आणता शेतीसाठी पाण्याचे नियोजन करावे. दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व कार्यक्षमतेने वापर करून लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळेल, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० नोव्हेंबरला

बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पातील पाण्याची उपलब्धता, विविध धरणांतील साठा, मंजूर आरक्षण आणि प्रस्तावित आवर्तनांचे सादरीकरण केले. त्यानुसार रब्बी हंगामातील पहिले आवर्तन २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत एक टीएमसी, तर दुसरे आवर्तन १९ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२७ या कालावधीत १.३५५ टीएमसी पाण्याचे प्रस्तावित आहे. उन्हाळी हंगामासाठी २० एप्रिल ते १ मे २०२७ या कालावधीत एक आवर्तन प्रस्तावित करण्यात आले आहे.

अमरावतीत श्री संत शिरोमणी रूपलालजी महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक उभारणार: मुख्यमंत्री फडणवीस

Web Title: Nandur madhameshwar project three water rotations farmers 2026 sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Farmer Crisis
  • Rabi season

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : अतिक्रमण कारवाईला न्यायालयाचा हिरवा कंदील; रोशन गेट प्रकरणात ५० लाखांच्या नुकसानभरपाईच्या याचिकेला धक्का
1

Sambhajinagar News : अतिक्रमण कारवाईला न्यायालयाचा हिरवा कंदील; रोशन गेट प्रकरणात ५० लाखांच्या नुकसानभरपाईच्या याचिकेला धक्का

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण
2

Groundwater Recharge Project : सेलू पंचायत समितीचा जलसंवर्धनाचा आदर्श उपक्रम! चार रिचार्ज पिटमधून १६ लाख लिटर पाण्याचे पुनर्भरण

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड
3

Sambhajinagar News : रात्री १२ वाजेपर्यंत फाईल स्वीकारण्याची प्रक्रिया तिजोरीत १०८ कोटींचा महसूल, गुंठेवारीसाठी नागरिकांची झुंबड

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती
4

Sambhajinagar Building Collapse : संभाजीनगरमध्ये व्यापारी संकुलाचे छत कोसळले; कामगार दबल्याची भीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.