
पाचोड, (वा.) अनधिकृत उत्पन्नापुढे सर्व काही अलबेल झाले असून शासनाकडून वाळू उपशाला परवानगी मिळण्यापूर्वीच पैठण तालुक्यातील गोदावरी नदी पाञतून बेकायदेशीर वाळूची चोरी मोठ्याप्रमाणात केली जात आहे. दिवस राञ वाळूची केनीच्या मदतीने उपसा करुन त्याची वाहतुकी द्वारे विल्हेवाट करण्यात येत आहे. यामुळे शासनाचे लाखोंचे महसूल बुडत असतांना पोलिस विभाग आणि महसूल विभागाचे याकडे मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, पाचोडसह पैठण एमआयडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून नव्या जोमाने गोदावरीपात्र वाळू तस्कराकडून पोखरण्यास सुरुवात झाली आहे. गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांची मोठी रेलचेल वाढली असून पोलिसांसह अन्य प्रशासकीय यंत्रणेशी वाळूतस्करांनी रुजुळतेर घेतल्याने वाळूतस्करांना मोकळे रान मिळाले असल्याचे पाहवयास मिळते. यामुळे शासनाचा कोट्यावर्षीचा महसूल बुडत आहे. पैठण एमआयडी पाचोड पोलिसांसह महसूल विभाग वाळू व्यवसायावर निर्बंध आल्याने आर्थिक कोंडीत सापडले.
अखेर त्यांची सहनशिलता संपल्याने या विभागाने आपल्या स्तरावर वाळु तस्करांची बैठक घेऊन त्यांना ग्रिन सिग्नल दिल्याने वडवळी, मायगाव, नायगाव, आयटीआय हिरडपूरी, टाकळी अंबड, आवडे उंचेगाव, विहामांडवा, नवगाव, घेवरी, हिंगणी आदी वाळुपट्टयात वाळू तस्करांनी आपला हैदोस मांडला असून आपणांस मिळणाऱ्या अनधिकृत उत्पन्नापुढे प्रशासकीय यंत्रणा कानाडोळा करीत आहे.
वाळू घाटाचे लिलावच नाही; तस्कराचे फावले
बाळू पट्टयात वाळू व्यवसायीकांचा मोठ्या प्रमाणावर वावर वाढला असून वाळू उपसा जोरात सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. वाळू माफियांनी आपणांस पोलिसांसह महसुल विभागाकडून गुपचूप परवानगी मिळाल्याने गोदावरी नदी पात्राचे लचके तोडण्यास मोठ्या उमेदीने सुरुवात केली आहे. प्रशासनाच्या डोळयांवर टिच्चून वाळू उपसा होत असतांनाही त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई होत नसल्याने वाळू माफियानी घट्टपाय रोवल्याचे दिसून येत आहे.
पैठण तालुक्यातील पोलीस व महसूल विभागाला वाळू माफीयाकडून एक महिन्याचे रमिनी रिचार्जर झाले असल्याची चर्चा ऐकावयास मिळते. या वाळू माफियांना पोलिस, महसूल, आरटीओ यंत्रणेचा धाक नसल्याने ते बिनदिक्कत वाळू उपसा करून बिनदिक्कत वाहतूक करित असल्याचे बोलले जात आहे. पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करू देण्यासाठी महसूल, पोलिस, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक याशिवाय काही विशेष व्यक्तीचे एजेंट यांना एका शाखा, आरटीओ, पोलिसांचे विविध विशेष पथक, हायवा, ट्रैक्टर चालक कडून महिन्याला मोठ्या रक्कमेचे अनधिकृत उत्पन्न मिळवून दिले जात आहे. त्यामुळे तालुक्यातील हिरडपुर, नवगाव, विहामांडवा, आयडे उंचेगाव, अंबड टाकळी परिसरातून अहोरात्र गोदावरी पात्रातून अवैध वाळू उपसा करून चोरटी वाहतूक केली जात आहे. तुर्तास ट्रॅक्टर व मिनी हायवा वाहनाने मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जात आहे.
गोदावरी पात्रातील वाळूचे प्रमाण कमी झाल्याने भविष्यात त्याचा लिलाव न होता परिसर शासनाला कोट्यावधी महसुलाला मुकावे लागेल, वाळू उपसामुळे भविष्यात परिसरातील भूजल पातळीत मोठी घट होऊन नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. वाळू उपसामुळे विविध प्रकारचे जल किडे, मासे, शंख, शिंपले नष्ट होत असून पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. वाळूघाटाचे लिलाव झालेले नसतानाही गोदावरी नदीपात्रांतून वाळू उपसा सुरू झाला असून महसूल अधिकारी व पोलिसांनी एक महीन्याभरासाठी मोठं पॅकेज घेतल्याचे बोलले जात आहे. वाळू माफियांचे पत्रवत वाळूची वाहने रात्री सुसाट वेगाने पळवली जात असल्याच्या चर्चेला यामुळे उत आला आहे. अहोरात्र आहेत. पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांना या सुसाट वाहनांमुळे रस्त्यांवर चालणेही जिकरीचे झाले आहे.
वाळूबंदीचा वाळूतस्करांना दुपट्टीने लाभ
सध्या पैठण तालुक्यात प्रधानमंत्री आवास घरकुलाचे जवळ्यास साडेसात हजार कामासह अन्य खासगी कामे उरकण्यात येत आहे. बांधकामासाठी वाळु उपलब्ध होत नसल्याने संबंधित लाभार्थी दाम दुप्पटीने वाळू खरेदी करून गरज पूर्ण करीत आहे. तुर्तास वाळू तस्कर सात ते नऊ हजार रुपये ब्रासप्रमाणे वाळू विकून दामदुप्पट नफा कमवित आहे. हा काळ वाळु तस्करांसाठी पर्वणीकाळ समजला जात आहे. ज्योती पवार (तहसीलदार, पैठण), वाळू सुरू झाल्याची माहिती मिळताच आम्ही महसूल विभागाचे पथक नियुक्त केले असून सर्व पोलीस ठाण्यांना आमच्या कर्मचाऱ्यां सोबत एक पोलिस कर्मचारी देण्याची विनंती केली आहे. परंतु अद्याप पोलीस विभागाने मनुष्यबळ दिलेले नाही. आमच्या कर्मचाऱ्या नी वाळूचे वाहने गोदावरीत जाऊ नये म्हणून रस्त्याच्या मध्यभागी चर खोदून वाहतुकीस अडथळे घातले आहे. ज्या ज्या ठिकाणी आम्हाला वाळूची वाहतूक होतांना दिसेन त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यावर आमचे पथक लक्ष देऊन आहे.