
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Indurikar Maharaj Kirtan : वाढती व्यसनाधीनता, कौटुंबिक नात्यांमधील दुरावा, शेतकरी आत्महत्या आणि ग्रामीण शिक्षणाचे महत्त्व अशा विविध सामाजिक प्रश्नांवर परखड भाष्य करत कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी आपल्या कीर्तनातून समाजप्रबोधन केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अलौकिक प्रतिभेचा गौरव करताना, ज्ञानेश्वरी हा केवळ ग्रंथ नाही, तर अवघ्या नऊ वर्षांच्या चालकाने निर्माण केलेला अमृताचा सागर आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन कांजुणे पाटील आणि नाभिक समाज, लासूर स्टेशन यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
आजचा तरुण व्यसनाच्या विळख्यात अडकत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत इंदुरीकर महाराज यांनी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा द्यावी, असे आवाहन केले, मुलींच्या घर सोडून जाण्याच्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी पालक आणि मुलामधील संवाद, परस्पर विश्वास आणि संस्कार यांचे महत्त्य अधोरेखित केले. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक आणि वैचारिक विचारांचे महत्त्व विशद करताना, आम्ही केवळ कीर्तनकार नसून विठ्ठल-रखुमाईचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणारे सेवक आहोत. असे इंदुरीकर महाराज म्हणाले.
अकोल्यात वाढतोय डेंग्यू, चिकनगुनियाचा धोका; डेंग्यूचे 155 तर चिकनगुनियाचे 130 रुग्ण
कीर्तन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजप्रबोधन आणि तरुणांना योग्य दिशा देण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले, इतिहास कर्तृत्वाने लिहिला जाती, असे नमूद करत त्यांनी देशासाठी बलिदान देणाऱ्या शुरवीराच्या योगदानाचा गौरव केला. त्यांच्या कीर्तनातून आध्यात्मिक विचारांसोबतच सामाजिक जबाबदारी, कौटुंबिक मूल्ये आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाला महानराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्य सल्लागार दिलीप अनर्थे, सुधाकर आहेर, दादासाहेब काळ दिलीप गवली अण्णा, स्वीद्र सहज, रणजि मथुरिया, दिलीप विश्वासु, अशोक पवार, सोमिना तावरे आणि उद्योजक रितेश चंडालिया यांच्यास अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच यशस्वितेसाठी मोहसीन बागवान, भैय्या लिगायन प्रतीक खडेलवाल, आकाश भगुरे रवि वाथ, अशो घोडके, राजू तुपे, विजय भाले, शुभम धने, दत्ता तु मधुकर लिगायत, ज्ञानेश्वर औटी आणि बापू मो यांच्यासह कार्यकत्यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेतकऱ्यांना आवाहन दुष्काळ आणि शेतक-यांच्या समस्यांवर भाष्य करताना आत्महत्या हा कोणत्याही समस्येवर उपाय नसल्या त्यांनी स्पष्ट कैले, संकटांचा वैर्याने सामना करून जीवनात मार्ग शौचण्याची गरज असल्याचे सांगत त्यांन शेतक-यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले, तसेच, ग्रामीण भागातील विद्याथ्यांना दगैंदार शिक्षण मिळण्यासाठी जिल परिषद शाळा टिकवणे आणि त्यांचे महत्त्व जपणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.