Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rural Students Reading Initiative : मोबाईल नव्हे, पुस्तकांशी मैत्री ! कन्नड तालुक्यात वाचन संस्कारांचा अभिनव उपक्रमम

Rural Students Reading Initiative : मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमी होत असलेली वाचनाची आवड पुन्हा निर्माण करण्यासाठी कन्नड येथील सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयातर्फे 'पुस्तक पेटी' हा उपक्रम राबविण्यात येणार.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 15, 2026 | 05:05 PM
Book Box Initiative in Kannad Schools to Promote Reading Habits ( कन्नडमधील शाळांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी 'बुक बॉक्स' उपक्रम )

Book Box Initiative in Kannad Schools to Promote Reading Habits ( कन्नडमधील शाळांमध्ये वाचनाची सवय रुजवण्यासाठी 'बुक बॉक्स' उपक्रम )

Follow Us
Follow Us:
  • शाळांमध्ये पुस्तक पेटी पोहोचविण्यात येणार 
  • पुस्तक पेटी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार 
  • विद्यार्थ्यांना फायदा होईल 
Rural Students Reading Initiative :  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्या मध्ये नवीन उपक्रम सुरू होतोय. मोबाईलच्या युगात मुलं पुस्तकांपासून दूर चालली आहेत. वाचनाची गोडी कमी होत चालली आहे. हीच गोडी पुन्हा निर्माण व्हावी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर वाचनाचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, कन्नड यांच्यातर्फे कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये पुस्तक पेटी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. एकूण दहा शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून, त्याचा पहिला टप्पा म्हणून आठ शाळांमध्ये येत्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथी निमित्त या उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

शाळांमध्ये पुस्तक पेटी पोहोचविण्यात येणार

पहिल्या टप्प्यात नेवपूर, घाटशेंद्रा, वाकी, भोकणगाव, निमडोंगरी, रिठी तांडा, बहिरगाव आणि रामपूरवाडी या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये पुस्तक पेटी पोहोचविण्यात येणार आहे. उर्वरित दोन शाळांमध्ये दुसऱ्या टप्प्यात पुस्तक पेटी देण्यात येणार आहे. या पुस्तक पेटीत बालसाहित्य, गोष्टींची पुस्तके, कविता, चरित्रे, ज्ञानवर्धक पुस्तके, तसेच विद्यार्थ्यांना आवडतील अशी रंगीत, चित्रांची पुस्तके ठेवण्यात येणार आहेत.

Koyta Gang Attack: रात्रीच्या अंधारात हादरले हडपसर! सुरक्षक्षकावर जीवघेणा हल्ला करून पळणाऱ्या गुंडांनी तब्बल ११ गाड्या फोडल्या

पुस्तक पेटी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार

शाळेतील शिक्षकांच्या माध्यमातून ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. विद्यार्थी ती वाचतील, एकमेकांशी चर्चा करतील आणि पुन्हा पेटीत ठेवतील. ग्रामीण भागातील शाळांमध्ये पुस्तके सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे पुस्तक पेटी हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरणार आहे. लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून सुरू होणारा हा उपक्रम तालुक्यातील वाचन चळवळीला नवी दिशा देणारा ठरेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. या प्रसंगी प्राचार्य डॉ. विजय भोसले, वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार, संजय जाधव, डॉ. रुपेश मोरे, डॉ. शिवाजी हुसे, डॉ. उदय डोंगरे, डॉ. रामचंद्र झाडे, विलास पवार, प्रा. अशोक भोसीकर, प्रा. संतोष देशमुख आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना फायदा होईल

ग्रामीण भागातील विद्याथ्यांपर्यंत पुस्तके पोहोचली पाहिजेत. वाचनातूनच मुलांचे व्यक्तिमत्त्व घडते. त्यासाठीच हा पुस्तक पेटी उपक्रम सुरू करत आहोत. या उपक्रमाचा निश्चितच फायदा होईल, असा विश्वास यावेळी मानसिंह पवार यांनी व्यक्त केला.

Chandrapur News: कन्हाळगावच्या जंगलात 32 वाघांचा वावर; अभयारण्य रद्द करण्याच्या मागणीवर सोमवारी महत्त्वाची बैठक

Web Title: Kannad book box initiative rural school students reading culture sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhaji Nagar
  • Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation
  • Rural Areas

संबंधित बातम्या

Sambhajinagar News : पावसाच्या खंडाचा खरिपाला मोठा फटका; संभाजीनगर जिल्ह्याची पैसेवारी ४५.७२ पैशांवर
1

Sambhajinagar News : पावसाच्या खंडाचा खरिपाला मोठा फटका; संभाजीनगर जिल्ह्याची पैसेवारी ४५.७२ पैशांवर

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी
2

Sambhajinagar News : अनाथ मुले अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद; ३८४ जणांसोबत साजरी केली दिवाळी

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!
3

Diwali Fire Incidents: “आनंदाचा सण ठरला जीवघेणा!” शहरात फटाक्यांच्या आतषबाजीत ५५ हून अधिक जण जखमी; ३० ठिकाणी आगीचा तांडव!

Child Marriage Free India Campaign : महाराष्ट्रातील शाळांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती; शिक्षण विभागाचे निर्देश
4

Child Marriage Free India Campaign : महाराष्ट्रातील शाळांमध्ये बालविवाहविरोधी जनजागृती; शिक्षण विभागाचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.